घरदेश-विदेशनेपाळमधील अतिवृष्टीमध्ये ३५ जण मृत्यू तर ४०० जण जखमी

नेपाळमधील अतिवृष्टीमध्ये ३५ जण मृत्यू तर ४०० जण जखमी

Subscribe

नेपाळला अतिवृष्टी आणि वादाळणाचा फटका बसला आहे. आता पर्यंत २७ जणांचा मृत्यू तर ४०० हून अधिक नागरिक या नैसर्गिक आपत्तीमध्ये जखमी झाले आहेत.

अपडेट

अतिवृष्टी आणि वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या नेपाळमध्ये २७ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत्यूच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. आता ३५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


नेपाळला अतिवृष्टी आणि वादाळणाचा फटका बसला आहे. हिमालयन टाइम्सच्या वृत्तातुन समोर आले की, अतिवृष्टीमुळे २७ जण मृत्यू झाले आहेत, तर ४०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तसेच नेपाळच्या दक्षिण भागाला वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. बारा आणि परसा या जिह्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच जिल्हा पोलीस कार्यालयाने जीवितहानीच्या आकडेवारीमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -


प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन

नेपाळ प्रशासनाकडून नागरिकांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. आपत्कालीन परिस्थीतीमध्ये कार्य करण्यासाठी २ एमआय १७ हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे. आपातकालीन भागात १०० हून अधिक टीम कार्य करीत आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या परिवारांबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. तर प्रशासनाला या आपत्तीवर मात करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहे, असे नेपाळचे लष्करी प्रवक्ते याम प्रसाद ढाकल यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -