घरदेश-विदेशबँकेचा निष्काळजीपणा?; बॉक्समधल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, पाहा काय आहे प्रकरण?

बँकेचा निष्काळजीपणा?; बॉक्समधल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, पाहा काय आहे प्रकरण?

Subscribe

कानपूर – लोक आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी बँकेत ठेवतात. मात्र, बँका स्वत:कडे ठेवलेल्या नोटा किती जबाबदारीने ठेवतात याचे एक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पहायला मिळाले. शहरातील पांडू नगर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ठेवलेल्या करन्सी चेस्टमध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा पाण्यामुळे भिजल्याचे समोर आले आहे.

3 महिन्यांपूर्नी या नोटा बँकेत एका बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान काही कारणाने बॉक्समध्ये पाणी गेले. त्यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी बॉक्मधील सर्वात वरच्या नोटा पाहिल्या. मात्र, खालच्या बाजूला ठेवलेल्या नोटा त्यांनी पाहिल्या नाहीत. त्यामुळे पाण्यामुळे भिजलेल्या नोटा सुकल्या असतील असे त्यांना वाटले.

- Advertisement -

बँकेच्या तिजोरीत जागाच शिल्लक नव्हती. रोकड वाढली की नोटा बॉक्समध्ये भरून भिंतीजवळ ठेवल्या जात होत्या. याठिकाणी पावसात तळघराची भिंत ओलसर झाल्याने बॉक्समध्ये पाणी शिरले. त्यानंतर बराच वेळ बॉक्सकडे बँक कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही, त्यामुळे 42 लाख रुपयांच्या नोटा भिजून खराब झाल्या, असे सूत्रांनी सांगितले

या घटनेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पथक पाहणीसाठी दाखल झाले होते. तपास सुरू झाल्यावर हे प्रकरण वरीष्ट अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. त्यासाठी पुन्हा दुसरे पथक तयार केले. या दक्षता पथकानेही तपास केला.पथकाने नोटांची देखरेख का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तपास अहवाल आल्यानंतर याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांडू नगर शाखेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक देवीशंकर, व्यवस्थापक आसाराम, चेस्ट ऑफिसर राकेश कुमार आणि वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर कुमार भार्गव यांचा सहभाग आहे. देवीशंकर यांनी 25 जुलै रोजीच पांडू नगर शाखेत काम हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर नोटा भिजल्याची घटना ते बँकेत येण्यापूर्वीच घडली होती.

या घडलेल्या घटनेबातत सध्या पंजाब नॅशनल बँकेकडून कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या सर्कल हेडला फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -