घरदेश-विदेशमसूद अझहरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक; पाकिस्तानचा दावा

मसूद अझहरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक; पाकिस्तानचा दावा

Subscribe

भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या अनेक नातेवाईकांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई केली आहे. पाकिस्तान सरकारने असा दावा केला आहे की, जैश-ए-मोहम्मदच्या ४४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या अनेक नातेवाईकांचा समावेश आहे. मसूदचे भाई अब्दुर रौफ आणि हम्माद अझरसह ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

कोणाच्याही दबावाखाली कारवाई नाही

पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईबाबतची माहिती दिली. मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ आणि हम्माद अझर यांच्यासह ४४ जणांना अटक करण्यात आल्याचे अफ्रिदी यांनी सांगितले. भारताने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालामध्येही रौफ आणि अझरच्या नावांचा समावेश होता असे ते म्हणाले. भाराताच्या दबावानंतर ही कारवाई केली असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, कुणाच्याही दबावाखाली ही कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा अफ्रिदी यांंनी केला आहे.

पुलवामा हल्लयानंतर भारताचा एअर स्ट्राईक

पुलवामा येथे १४ फेब्रवारीला भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. सीआरपीएफ जवानांच्या बसला लक्ष्य करत २५० किलोच्या आरडीएक्सचा स्फोट केला होता. या हल्लयात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला. पाकिस्तानने त्यांच्याकडे असलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देखईल केली जात होती. भारताकडून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाब आणला जात होता.

- Advertisement -

 

हेही वाचा – 

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद का संपत नाही? शैलेंद्र देवळणकर यांचे विश्लेषण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -