घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये सीआरपीएमच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला; ६ जखमी

काश्मीरमध्ये सीआरपीएमच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला; ६ जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएमच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर ग्रेनेड हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात ६ जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफ जवानांचे एक पथक तपासणीसाठी नाक्यावर तैनात करण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास तिथे आलेल्या दहशतवाद्यांनी जावानांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला आणि ते फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेले जवान हे सीआरपीएमच्या १४४ बटालियनची होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना श्रीनगरच्या करण नगर भागात घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शोध मोहीम सुरु

सीआरपीएफच्या पथकावर हल्ला करुन दहशतवादी पळून गेले आहेत. त्यांचा तपास सध्या सुरु आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. यासाठी करण नगर येथील प्रत्येक रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये पडला फुलांचा खच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -