घरक्राइमकोटा येथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची आत्महत्या, कुटुंबीयांना भेटल्यानंतर घेतला गळफास

कोटा येथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची आत्महत्या, कुटुंबीयांना भेटल्यानंतर घेतला गळफास

Subscribe

नवी दिल्ली : देशात कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटा येथे आणखी एका कोचिंग विद्यार्थ्याने गळपास लावून आत्महत्या केली आहे. कोटा येथील जवाहर नगर भागातील एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या भार्गव केशव (17) या विद्यार्थ्याने सोमवारी (12 जून) सकाळी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तो महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील कामनाथ नगरचा रहिवासी होता. तो कोटा येथे जेईई मेन परीक्षेची तयारी करत होता. (A student from Maharashtra committed suicide in Kota, hanged himself after meeting his family)

पोलिस उपअधीक्षक अमर सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थ्याचे कुटुंबीय दोन दिवसांसाठी कोटा येथे आले होते आणि एका हॉटेलमध्ये थांबले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता कुटुंबीय विद्यार्थ्याचे भेटण्यासाठी वसतिगृह गाठले. संभाषण झाल्यानंतर नातेवाईक नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले. विद्यार्थ्याने वसतिगृहातच नाश्ता केला. नाश्ता करून नातेवाईक परतले असता त्यांना खोली आतून बंद असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी वसतिगृहाच्या वॉर्डनला बोलावले.

- Advertisement -

खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे तो तोडला असता खोलीत विद्यार्थी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून कुटुंबीयांना रडू कोसळले आणि वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भार्गवचे त्यांच्याशी चांगले बोलणे झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याने खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, भार्गव केशव हा विद्यार्थी दोन महिन्यांपूर्वी कोटा येथे जेईई मेन परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता. त्याने तयारीसाठी ऍलन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कुटुंबियांकडे चौकशी केली, मात्र त्यांना आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

- Advertisement -

या वर्षात आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या
कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटा येथे या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील 11 विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्यामध्ये बहुतांश आत्महत्यांचे कारण अभ्यासातील ताण हे समोर आले आहे. मे महिन्यात 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 4 आत्महत्या कुन्हडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी NEET ची तयारी करत असताना आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत जिल्हा प्रशासन गंभीर दिसत नाही. मात्र कोचिंग इन्स्टिट्यूट या विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -