घरदेश-विदेशMRF : शेअर बाजारात एमआरएफची मुसंडी; एक Share एक लाख रुपये

MRF : शेअर बाजारात एमआरएफची मुसंडी; एक Share एक लाख रुपये

Subscribe

 

नवी दिल्लीः Madras Rubber Factory (MRF) कंपनीने शेअर मार्केटमध्ये मुसंडी मारली आहे. आज MRF च्या एका शेअरची किंमती तब्बल एक लाख रुपये झाली. शेअरची किमत एक लाखाच्या घरात गेलेली MRF ही शेअर मार्केटमधील पहिली कंपनी आहे. कंपनीने गाठलेल्या उच्चांकामुळे अनेक गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. १९९० साली या कंपनीच्या शेअर्सची किमत ३७० रुपये होती. तेव्हा या कंपनीचे शेअर्स घेणाऱ्यांना आज लॉटरीच लागली आहे.

- Advertisement -

आज शेअर बाजार उघडला तोच गुंतवणूकदारांसाठी खुशखबर घेऊन. MRF च्या शेअर्सने १.४८ टक्क्यांनी वाढला. या वाढीमुळे MRF च्या शेअर्सने १,००,४३९.९५ रुपयांचा टप्पा गाठला होता. एका क्षणात MRF ची चर्चा सर्वत्र सुरु झाली. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गेल्या महिन्यात ८ मे रोजी MRF च्या शेअर्सची किंमत ९९,९३३ रुपये होती. नंतर शेअर्सच्या किमतीत चढउतार सुरु होता. मंगळवारी सकाळी MRF च्या शेअर्सने एक लाख रुपयांच्या घरात प्रवेश केला. दुपार २ नंतर MRF च्या शेअर्सची किंमत तीन हजार रुपयांनी उतरली. हा शेअर ९७ हजार रुपयांवर येऊन पोहोचला. सोमवारी MRF चा शेअर ९९,९३३.५० रुपयांवर पोहोचला होता. ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर होता. गेल्या २३ वर्षांत MRF चा स्टॉक १०,००० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

१९४६ मध्ये MRF कंपनीने फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. १९५२ मध्ये कंपनीने टायर व्यवसायात प्रवेश केला.  कंपनीने १९६१ मध्ये शेअर बाजारात प्रवेश केला. MRF चे भारतात २५०० पेक्षा जास्त वितरक आहेत. जगातील ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये टायर्सची ही कंपनी निर्यात करते.

- Advertisement -

GDP ची घोडदौड सुरुच

गेल्या नऊ वर्षांत भारताच्या जीडीपीने (India’s GDP) लक्षणीय वाढ नोंदवली आहे. 2014मध्ये देशात मोदी सरकार आले तेव्हा देशाचा जीडीपी 2 ट्रिलियन डॉलर्स इतका होता आणि आज तो 3.75 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. भारत अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज, सोमवारी ट्विटरवरून दिली. जागतिक अर्थव्यवस्थेत (Global economy) भारताला आज ‘ब्राइट स्पॉट’ (Bright Spot) म्हटले जाते. भारताने गेल्या वर्षी ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा पराक्रम केला होता. आता भारताच्या पुढे फक्त अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश आहेत. आर्थिक वर्ष 2023मध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे. एकीकडे, इतर देश मंदीच्या सावटाखाली जगत असताना दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था मात्र रॉकेटच्या वेगाने वाढत आहे.

भारताला मंदीचा फटका नाही

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार (World of Statistics) भारतात मंदीची शक्यता नाही. जगभराचा विचार करता यूकेमध्ये मंदीची सर्वाधिक शक्यता 75 टक्के आहे. यूकेच्या अर्थव्यवस्थेत अलीकडे खूप उलथापालथ झाली आहे. गेल्या काही दशकांच्या तुलनेत तेथे महागाईने कळस गाठला आहे. या यादीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे यंदा मंदी येण्याची शक्यता 70 टक्के आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे मंदीची शक्यता 65 टक्के आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि ती जर मंदीच्या गर्तेत आली तर त्याचे भयंकर परिणाम जगभर दिसू शकतात.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -