घरदेश-विदेश'या' व्यवहारासाठी पॅन कार्डला पर्यायी येणार आधार कार्ड

‘या’ व्यवहारासाठी पॅन कार्डला पर्यायी येणार आधार कार्ड

Subscribe

५० हजारांहून अधिक रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्डच्या ऐवजी आधार कार्डचा वापर करणे शक्य होणार आहे.

महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी आपल्याला बँकेत ५० हजारांहून अधिकचा व्यवहार करायचा असला तर पॅन कार्ड नंबर द्यावा लागत असे. तसेच पॅन कार्डची सर्व खात्रीनुसार माहिती घेवून व्यवहार केले जात होते. परंतु आता जर ५० हजारांहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असेल तर आता आधार कार्डचा वापर करून व्यवहार करणं शक्य होणार आहे.

आता ज्या व्यहारांसाठी पॅन कार्डचा अधिक वापर केला जात होता. त्याऐवजी आता आधार कार्डचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी बँका आणि इतर संस्थांना यंत्रणा आधार कार्ड वापरण्यासाठी अद्ययावत करावी लागणार आहे.

- Advertisement -

हॉटेल आणि विदेशी दौरा करताना पॅनकार्ड आवश्यक

काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पमध्ये करदात्यांना देखील आयकर भरण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक नसल्याची घोषणा दिली होती. १२० कोटी भारतीय नागरिकांकडे आधार आहे. २२ कोटी पॅन कार्डशी हे आधार लिंक केलेल आहे. म्हणून पॅन कार्डऐवजी आता आधार कार्डचा वापर करून बँकेचे व्यवहार करता येणार आहे. हॉटेल आणि विदेशी दौरा करताना ५० हजारांपेक्षा अधिक व्यवहाराकरिता तसेच १० लाखांहून अधिकच्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड हे आवश्यक आहे, असे देखील महसूल सचिव अजय भूषण पांडे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -