घरमहाराष्ट्रनाशिककाझी गढीवरील ५० कुटुंबांचे अखेर स्थलांतर, आज निघणार तोडगा

काझी गढीवरील ५० कुटुंबांचे अखेर स्थलांतर, आज निघणार तोडगा

Subscribe

रहिवाशांनी दर्शवली पुनर्वसनाची तयारी, आमदार फरांदे सोमवारी महापालिका आयुक्तांशी करणार चर्चा

धोकादायक बनलेल्या काझी गढीचा प्रश्न हाताळताना जेरिस आलेल्या महापालिका प्रशासनाला अखेर येथील ५० रहिवाशांचे स्थलांतर करण्यात रविवारी, ७ जुलैला सकाळी यश आले. दरम्यान, येथील रहिवाशांनी पुनर्वसनाची तयारी दर्शवल्याने, सोमवारी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या मध्यस्थीने महापालिका आयुक्त व प्रसंगी शासनाशी चर्चा करण्यावर रहिवाशांचे एकमत झाले. सोमवारी, ८ जुलैला सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर येथील रहिवाशांनी येण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी सकाळच्या सुमारास गढीवरील ५० घरांमधील कुटुंबांना गाडगे महाराज धर्मशाळेसह रंगारवाडा शाळेत हलविण्यात आले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पोलिस बळाचा वापर करत उर्वरित रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, आमदार प्रा. देवयांनी फरांदे यांनी रहिवाशांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी पुनर्वसनाची तयारी दर्शविल्यानंतर प्रशासनानेही सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे अनेक वर्षांपासून भिजत पडलेला काझी गढीचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -