घरदेश-विदेशविमानात सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप; भारतीय नागरिकाला अटक

विमानात सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप; भारतीय नागरिकाला अटक

Subscribe

नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये भारतीय नागरिकाने सहप्रवाशावर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) अटक करण्यात आली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानामध्ये (American Airlines planes) न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवास करताना हा प्रकार घडला.

गेल्या काही दिवसांपासून विमानात गैरवर्तन करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अमेरिकन एअरलाइन्सचे विमान AA 292 मध्ये आरोपी भारतीय नागरिकाने दारूच्या नशेत आधी सहप्रवाशासोबत वाद घातला आणि त्यानंतर त्याने लघवी केल्याचा माहिती एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितली आहे. विमान कंपनीने विमान उतरवण्यापूर्वी दिल्ली विमानतळाला या प्रकरणाची माहिती दिली होती. रविवारी (23 एप्रिल) रात्री ९ वाजता दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) आरोपीला पकडले आहे. याप्रकरणी पीडित प्रवाशाने फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

लघवीची अनेक प्रकरणे समोर आली
मद्यप्राशन करून विमानात प्रवाशाने लघवी केल्याची प्रकरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये ७० वर्षीय मद्यधुंद प्रवाशाने कपडे काढून सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून संबंधित आरोपी मुंबईतील व्यावसायिक आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्यांने समजले की, आरोपीचे नाव शेखर मिश्रा असून त्याचे वय ४० ते ४५ दरम्यान होते.
यानंतर असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी, पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानामध्ये पॅरिसहून दिल्लीला येत ज्यावेळी महिला वॉशरूममध्ये गेली होती, त्यावेळी एका प्रवाशाने रिकाम्या सीटवर आणि महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याचा आरोप होता.

आरोपीवर 30 दिवसांची प्रवासबंदी
डिसेंबरमध्ये घडलेल्या प्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून काही त्रूटी राहिली का, याची चौकशी करण्यासाठी आणि तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यात विलंब कशामुळे झाला याचा तपास करण्यासाठी एक अंतर्गत समिती देखील स्थापन करण्यात आली होती. तसेच, एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास संबंधित प्रवाशाला 30 दिवसांची किंवा अंतर्गत समितीचा निर्णय होईपर्यंत बंदी घालण्यात आली होती. संपूर्ण चौकशीत संबंधित प्रवासी दोषी आढळल्यास नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -