घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरून केसीआर यांची सरकारवर टीका; म्हणाले, 'इतक्या नद्या तरी...'

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरून केसीआर यांची सरकारवर टीका; म्हणाले, ‘इतक्या नद्या तरी…’

Subscribe

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात अधिकाधिक नद्या आहेत, पण तरीही जनता पाण्यावाचून जगतेय, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समितीची सभा पार पडली.

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात अधिकाधिक नद्या आहेत, पण तरीही जनता पाण्यावाचून जगतेय, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समितीची सभा पार पडली. यावेळी केसीआर यांनी राज्यातील नेत्यांवर सडकून टीका केली. (Telangana CM K Chandrashekhar Rao Slams Maharashtra Government On Water Issue In State)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात सध्या सर्व पक्षीय प्रमुख सभा घेण्यात व्यग्र आहेत. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे देखील सभा घेण्यात मागे राहिलेले नाहीत. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा सुरू आहे. या सभेच्या सुरूवातीपासूनच के. चंद्रशेखर राव यांनी सरकारवर ताशेरे ओडण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून मला दोन प्रश्न सतावत आहेत. आपला देश महान आणि ऐतिहासिक परंपरा जपणार आपला देश आहे. पण आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे? का भारत आपले ध्येय विसरला? हेच दोन प्रश्न मला सतावत असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. तसेच, ‘माझे भाषण संपल्यानंतर भाषण ‘ऐकलं आणि सोडलं’ असे न करू नका. आपण जिथून आला असाल, त्या ठिकाणी सभेतील मुद्द्यांवर चर्चा करा, जणेकून आपल्याला सत्य परिस्थिती समजेल’, अशी विनंतीही के.सी.आर यांनी उपस्थितांना केली.

आपला देश ध्येय विसरला असेल तर, आपला भारत देश कुठे जाणार? आपल्या देशातील लोकसंख्या जगभरात सर्वात जास्त आहे. भारताला नवी दिशा देण्याची गरज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही शहरात आठ दिवसांत एकदाच पाणी येतं. अकोल्यातसुद्धा हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रातून ज्या नद्या वाहत आहेत, ज्या भारतातील इतर राज्यातून वाहत नसतील. गोदावरी, कृष्णा, पेनगंगा, वैनगंगा, मंजिरा, भीमा, गटप्रभा, पंचगंगा यांसह अनेक नद्या महाराष्ट्रातून वाहत आहेत. इतक्या नद्या आणि आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ज्या राज्यात आहे, तर या राज्यातील सरकार आपल्या जनेतेला पाणी देऊ शकत नाही का?

- Advertisement -

राज्यातील जनता आपल्याकडे सोन्याच्या विटा मागत नाही केवळ पिण्याचे पाणी मागत आहे. राजकारण्यांच्या वारंवार घोषणानंतर आणि राजकीय गोंधल घातल्यानंतरही पिण्याचं पाणी आपल्याला मिळू शकत नाही, असा भारत पुढेही रहावा की बदलायला हवा. बेरोजगारी वाढतेय, लाखो उद्योग बंद होताहेत. देशात जातीयवाद, धार्मिक, लिंगभेद सुरु आहे. जो श्रीमंत आहे तो अधिकच श्रीमंत होतोय, जो गरीब आहे तो अधिकच गरीब होतोय, हे वास्तव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले पण अजून काही झालेले नाही. देशात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. पण सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं गांभीर्य नाही. देशात लोकशाही परंतु तरीही शेतकऱ्यांना १३ महिने आंदोलन करावे लागले.


हेही वाचा – मोठी बातमी! राज्यभरातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -