घरदेश-विदेशWar Fear : इराण, इस्राएलला जाऊ नका; केंद्र सरकारचे भारतीयांना निर्देश

War Fear : इराण, इस्राएलला जाऊ नका; केंद्र सरकारचे भारतीयांना निर्देश

Subscribe

War Fear : इराण आणि इस्राएलमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर केंद्र सरकारने भारतीयांनी या दोन देशात जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली : इराण आणि इस्राएलमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर केंद्र सरकारने भारतीयांनी या दोन देशात जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. पुढील 48 तासात इराण इस्राएलवर हल्ला करू शकतो, अशी शक्यता वॉल स्ट्रीट जर्नलने व्यक्त केली आहे. इराणमधील नेत्यांच्या सूत्रांच्या माहितीनंतर वॉल स्ट्रीट जर्नलने हे वृत्त दिले आहे. त्यानंतरच भारत सरकारने या सूचना दिल्या आहेत. (Advisory of the Indian Government for Indian Citizens in Iran and Israel)

केंद्र सरकारच्या सूचना काय? (What are the instructions of the central government?)

काही दिवसांपूर्वी सीरियामधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. यानंतर या दोन्ही देशांमधील तणाव अजूनच वाढला. लवकरच इस्राएलवर हल्ला करण्यात येईल, असे वृत्त आल्याने भारत सरकारने आपल्या नागरिकांना या दोन्ही देशात जाण्यास मनाई केली आहे. तसेच या दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपली काळजी घेण्याचे तसेच आपल्या हालचाली कमीतकमी ठेवण्याचे आवाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. सध्या या भागात जी परिस्थिती आहे, ती पाहता नागरिकांनी या दोन्ही देशात जाणे टाळावे. तसेच जे भारतीय सध्या या दोन देशात आहेत, त्यांनी तातडीने तेथील भारतीय दूतावासासोबत संपर्क करावा आणि आपली नोंदणी करून घ्यावी, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (Advisory of the Indian Government for Indian Citizens in Iran and Israel)

- Advertisement -

काय आहे प्रकरण? (What is the matter?)

इराणी सैन्यातील एका वरिष्ठ सल्लागाराने दिलेल्या माहितीनुसार, दमास्कसमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला इशारा देण्यात आलेला आहे. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार ठरवण्यात आले आहे. या हल्ल्यात इराणचा दूतावास नष्ट झाला आहे. इस्राएल विरोधी कृत्यांसाठी ही इमारत वापरली जात असल्याचे इस्राएलचे म्हणणे आहे. यामुळेच मध्य पूर्वेत संघर्ष वाढीस लागण्याची शक्यता आहे. तेहरान या हल्ल्याचा बदला घेईल, अशी परिस्थिती आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला समर्थन दिले आहे.

- Advertisement -

दोन्ही देशांमध्ये किती भारतीय? (How many Indians in both countries?)

आजघडीला इस्राएलमध्ये 18,000 भारतीय नागरिक आहेत. यातील बहुतेक भारतीय आयटी क्षेत्रात आहेत किंवा अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत. 64 भारतीय कामगारांची पहिली बॅच 2 एप्रिल रोजी इस्रायलला रवाना झाली होती. तर आणखी जवळपास 6,000 भारतीयांना पुढच्या महिन्यात पाठवले जाणार होते. मात्र, आता ते शक्य होईल असे वाटत नाही. तर इराणमध्ये जवळपास 5 हजार भारतीय आहेत. यातील बहुतेकजण हे छोटे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात आहेत. (Advisory of the Indian Government for Indian Citizens in Iran and Israel)

हमासविरोधातील इस्राएलच्या युद्धाला 6 महिने पूर्ण झाले असून अजूनही तिथे तणाव आहे. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचे लष्करी सल्लागार जनरल रहीम सफवी यांच्या बोलण्यातून मिळालेल्या संकेतानुसार कोणत्याही दूतावासावरील हल्ल्याचे असेच प्रत्युत्तर दिले जाते. सध्या यात असलेल्या राजकीय जोखमीचा अंदाज घेतला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -