घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना देश तोडायचा आहे, प्रकाश आंबेडकर यांचा...

Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना देश तोडायचा आहे, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Subscribe

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत. ही प्रतिके पंतप्रधान नरेंद्र मोदी संपवायला निघाले असून त्यांना देश तोडायचा आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

चंद्रपूर : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत. ही प्रतिके पंतप्रधान नरेंद्र मोदी संपवायला निघाले असून त्यांना देश तोडायचा आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (ता. 12 एप्रिल) चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला. तुमच्या दारात ईडी, सीबीआय नको असेल तर मोदींचे सरकार देशात येऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोदींचे सरकार आले तर देशात व्यापाऱ्यांवर पुन्हा धाडीचे सत्र सुरू होईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Lok Sabha Election 2024 Prakash Ambedkar serious allegations against PM Narendra Modi)

चंद्रपूर येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीची तयारी करावी. तर दुसरीकडे सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. भाजपने 2014 पासून काँग्रेसला संपविण्याची भाषा सुरू केली. हे राजकीय भांडण असल्याचे प्रत्येकाचे मत झाले होते. परंतु, काँग्रेस सोडले तर भाजपाच स्वतःला संपवायला निघाला आहे आणि गेल्या दोन-वर्षांत हे प्रकर्षाने दिसू लागले आहे, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकरांनी डागले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : संजय मंडलिकांना विजयी करण्यासाठी धनंजय महाडिकांची मतदारांना ऑफर

पंतप्रधान मोदी हे भाजपाचे सरकार असे कधीच बोलत नाहीत. तसेच त्यांनी कोणतीही योजना आणली तरी ते सरकारची नसून नरेंद्र मोदींचीच आहे, असे सांगतात. त्यामुळे ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भाजपा संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे भाजपा संपला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली असून देशाला पक्षरहित करण्याचे धोरण चाललेले आहे. मोदींच्या पोटामध्ये जे आहे ते आता ओठांवर येऊ लागले आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आमचे मतभेद कायम आहेत. पण संघाच्या जोरावर मोदींचे सरकार आले असे म्हटले जात असेल तर गेल्या अडीच वर्षांत मोहन भागवत यांनी मोदींकडे कितीवेळा वेळ मागितला किंवा आपण भेटले पाहिजे, असे मोदींना सांगितले आहे? या अडीच वर्षांच्या कालावधीत मोदी भागवतांना भेटत नसतील तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा आणि संघाच्या कार्यकर्त्यांना मोदींची ही भूमिका मान्य आहे का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. कारण, प्रचार करताना उमेदवार हा भाजपाचा नव्हे तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा… Jitendra Awhad : निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का? आव्हाडांची पोस्ट व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -