घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या ISk मध्ये २०० भारतीय दहशतवादी, महिलांचाही समावेश

अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या ISk मध्ये २०० भारतीय दहशतवादी, महिलांचाही समावेश

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेले हे भारतीय दहशतवादी भारतातही दहशतवादाचे मॉड्यूल उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर आयएसके( इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन) ही दहशतवादी संघटना सक्रीय झाली आहे. याच संघटनेने काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारत या हल्ल्यात १४ भारतीयांचाही समावेश असल्याचे जाहीर केले होते. पण आता या संघटनेशी संबंधित गटात २०० भारतीय दहशतवादी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात महिला दहशतवादीही आहेत. यामुळे भारताच्या गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे.

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेले हे भारतीय दहशतवादी भारतातही दहशतवादाचे मॉड्यूल उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या पाच वर्षात एनआयएने आयएसकेशी संबंधित असलेल्या डझनभर संशयितांवर खटले दाखल केले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अफगाणिस्तानमध्ये २५ भारतीय दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यावर तपास करताना २०० भारतीय आयएसकेमध्ये सामील झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर मोठ्या संख्येने तुरुंगातील दहशतवाद्यांना सोडण्यात आले होते. यात अनेक आयएसकेचे दहशतवादी होते. यातील काही दहशतवादी भारतीय असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती. यातील सर्वाधिक दहशतवादी सीरिया आणि इराकमधले होते. पण बगदादीच्या मृत्यूनंतर विविध आखाती देशांच्या माध्यमातून हे सर्व दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये पोहचले. या दहशतवाद्यांच्या हालचालींवर भारतीय गुप्तचर यंत्रणा नजर ठेऊन आहेत. या दहशतवाद्यांची कामाची नोंदणी पाकिस्तानी वंशाचा मुनिसिब नामक व्यक्ती करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -