घरदेश-विदेशइटली सरकार देणार तिसर्‍या अपत्यानंतर शेतजमीन भेट

इटली सरकार देणार तिसर्‍या अपत्यानंतर शेतजमीन भेट

Subscribe

इटलीच्या सरकारने तिसरं अपत्य जन्माला घालणाऱ्या जोडप्याला शेतजमीन बक्षीस देण्याचे ठरवले आहे.

भारताची लोकसंख्या पाहता ती कमी करण्यासाठी जास्तीत जास्त काय योजना राबवता येतील याकडे सध्या सरकार लक्ष देत आहे. भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये २ रा क्रमांक लागतो. लवकरच हा आकडा बदलून १ क्रमांक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तर असे असताना दुसरीकडे इटली हा असा देश आहे ज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जन्मदर घटत चालला आहे. लोकसंख्या नसल्याची चिंता सध्या इटलीला सतावत आहे. त्यामुळे इटलीच्या सरकारने तिसर्‍या अपत्याला जन्म देणार्‍या जोडप्याला शेतजमीन बक्षीस देण्याची योजना आखली आहे.

इटलीमध्ये सर्वात कमी जन्मदर

युरोपमधील इटलीमध्ये सर्वात कमी जन्मदर असून अतिशय कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे तेथील सरकार सध्या लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. इथल्या राईट लीग पक्षाने तिसरे अपत्य जन्माला घालणार्‍या जोडप्यासाठी शेतजमीन बक्षीस देण्याचा प्रस्ताव सादर केला असून आगामी बजेटमध्येही मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार २०१९ ते २०२१ या कालावधीत ज्या जोडप्याला तिसरे मूल होईल त्या जोडप्याला २० वर्षांच्या करारावर शेतजमीन दिली जाईल. इटलीचे कृषीमंत्री जियान मार्को सँटिनियो यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

अजब योजना

मागच्या वर्षी इटलीमध्ये ४,६४,००० अपत्यांची नोंद झाली. मात्र युरोपमधील इतर देशांच्या तुलनेमध्ये ही संख्या अतिशय कमी असल्यामुळेच अशी अजब योजना इथल्या सरकारने योजली आहे. इतकेच नाही तर जी विदेशी जोडपी १० वर्षांपेक्षा अधिक काळ इटलीमध्ये राहात आहेत, त्या जोडप्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. दरम्यान ही योजना विवाहित जोडप्यांसाठीच लागू असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -