घरमुंबईम्हाडाची बहुप्रतिक्षित लॉटरी अखेर जाहीर; १३८४ घरांची सोडत!

म्हाडाची बहुप्रतिक्षित लॉटरी अखेर जाहीर; १३८४ घरांची सोडत!

Subscribe

म्हाडाच्या बहुप्रतिक्षित लॉटरीची घोषणा करण्यात आली असून ५ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. १६ डिसेंबरला लॉटरी काढण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आणि बहुप्रतिक्षित असलेली म्हाडाची लॉटरी अखेर जाहीर झाली आहे. तब्बल १३८४ घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. येत्या १६ डिसेंबरची तारीख या लॉटरीसाठी निश्चित करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारपासून या लॉटरीसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मुंबईत परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, यातली काही घरं ही कोट्यवधी किंमतीची असल्यामुळे म्हाडाची ही घरं खरंच परवडणारी आहेत का? आणि असल्यास कुणाला परवडणारी आहेत? असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

कोणत्या गटासाठी किती घरं?

या १३८४ घरांमध्ये म्हाडाने अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही गटांसाठी घरं तयार केली आहेत. यामध्ये अत्यल्प गटासाठीच्या घरांची किंमत किमान १४ लाख, अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांची किंमत २० ते ३५ लाख, मध्यम उत्पन्न गटासाठीच्या घरांची किंमत ३५ ते ६० लाख तर उच्च उत्पन्न गटासाठीच्या घरांची किंमत ६० लाखांहून अधिक आहे. विशेष म्हणजे परवडणाऱ्या घरांच्या यादीमध्ये म्हाडाच्या सर्वाधिक किंमतीच्या घराचाही समावेश असून कंबाला हिल परिसरात या सदनिका आहेत.

- Advertisement -

याच महिन्यात ५ तारखेला अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून १० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुंबईच्या विविध भागांमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कुठे किती सदनिका?

अॅण्टॉप हिल, वडाळा – २७८ सदनिका
प्रतिक्षा नगर, सायन – ८९ सदनिका
गव्हाणपाडा, मुलुंड – २६९ सदनिका
पी.एम.जी.पी. मानखुर्द – ३१६ सदनिका
सिद्धार्थ नगर, गोरेगाव(प) – २४ सदनिका
महावीर नगर, कांदीवली(प) – १७० सदनिका
तुंगा, पवई – १०१ सदनिका
मुं.इ.दु. आणि पु. मंडळाच्या – ५० सदनिका
विकास नियंत्रण विनिमय प्राप्त – १९ सदनिका
शहरात विखुरलेल्या – ६८ सदनिका

- Advertisement -

घरांच्या किंमतींचा विक्रम म्हाडाने मोडला!

यंदाच्या लॉटरीत म्हाडाने घरांच्या किंमतींचा विक्रमच मोडला आहे. तब्बल ५ कोटी ८० लाखांच्या किंमतीच्या घरांचा यंदा लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ग्रँट रोड येथील कंबाला हिल धवलगिरी भागात उच्च उत्पन्न गटासाठी ५ कोटी ८० लाखांच्या किंमतीची ९६५ चौरस फुटांची दोन घरे आहेत. हे लॉटरीतील सर्वाधिक किंमतीचे घर आहे. याआधी लॉटरीत १ कोटीच्या सर्वाधिक किंमतीच्या घराचा समावेश होता.


अधिक माहितीसाठी क्लिक करा – https://mhada.gov.in/mr

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -