घरताज्या घडामोडीCoronaVirus: दिल्लीतील तबलीग जमातच्या कार्यक्रमातील १०९५ जण गुजरातमध्ये!

CoronaVirus: दिल्लीतील तबलीग जमातच्या कार्यक्रमातील १०९५ जण गुजरातमध्ये!

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच दरम्यान दिल्लीत निजामुद्दीन मरकजमध्ये तबलीग जमातीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामधील अनेक मुस्लिम बांधवांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस समोर आले. तसंच या कार्यक्रमात अनेक राज्यातून आणि विदेशातून मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचं समोर आलं होत. आता या कार्यक्रमातील १०९५ जण तुर्कमान गेटच्या इथे जमात ए शूराचे आल्याचं समोर येत आहे. त्यामधील चार जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

गुजरातमध्ये ७० नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ३७८वर पोहोचली आहे. त्यामधील ३३ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

पोलीस महासंचालक शिवानंद झा म्हणाले की, दिल्लीतील निजामुद्दीन मकरजमधून गुजरातमध्ये आलेल्या १२७ जणांची ओळख पटली आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भरूचमधील शूरा जमातचे मकरजहून आलेले चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शूराचे १०९५ लोक गुजरातमध्ये आले आहेत. प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली आहे.

हे सर्वजण तमिळनाडूहून रेल्वेने अंकलेश्वरला पोहोचले आणि तेथून ते बसने भरुचमध्ये पोहोचले. हे सर्वजण १२ ते १७ मार्च पर्यंत मस्जिदमध्ये थांबले त्यानंतर बाजूच्या गावातील इखर मस्जिदमध्ये गेले. त्यामुळे आता इखरच्या बाजूची गाव सील करण्यात आली आहेत.

- Advertisement -

गुजरातमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्यावर कारवाई केली जात आहे. फेसबुक, ट्विटर, टिकटॉकचे १६४ अकाऊंट बंद करण्यात आले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus Effect: महिन्यातभरात एक अब्ज डॉलर्सने ट्रम्प यांच्या संपत्तीत घट!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -