घरदेश-विदेशHardeep Nijjar killing : अजित डोवल यांनी कॅनडाच्या NSA कडे मागितले पुरावे;...

Hardeep Nijjar killing : अजित डोवल यांनी कॅनडाच्या NSA कडे मागितले पुरावे; कोणतंही उत्तर नाही

Subscribe

भारतीय एनएसएने त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्याची मागणी केली होती, परंतु कॅनडा अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पुरावे देऊ शकले नाही.

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात निर्माण झालेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जोडी थॉमस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. काही दिवसांपूर्वी झालेल्या या संभाषणात डोवाल यांनी खलिस्तानी फुटीरतावादी, अतिरेकी आणि दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळत असल्याचा मुद्दा थॉमस यांच्यासोबत उपस्थित केला होता, अशी माहिती समोर आली. कॅनडात आश्रय घेत असलेल्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांबद्दल त्यांनी आपल्या कॅनडियन समकक्षांना सांगितले आणि त्यांची यादीही सुपूर्द केली. (Ajit Doval calls Canada NSA Jody Thomas to demand proof of allegations There is no answer )

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने जोडी थॉमससोबत वॉन्टेड गुन्हेगारांची माहिती आणि ठिकाणेही शेअर केली. कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार भारतीय समकक्ष अजित डोवाल यांना केला. एनएसए डोवाल यांनी जोडीला कॅनडाच्या बेछुट आरोपांबाबत पुरावे मागितले, परंतु कॅनडाचे एनएसए पुरावे देऊ शकले नाहीत. अजित डोवाल यांनी जोडी थॉमस यांना सांगितले की, कॅनडाने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे आणि इनपुट दिल्यास भारत तपास करण्यास तयार आहे.

- Advertisement -

कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जोडी थॉमस यांनी गेल्या महिन्यात दोनदा भारत भेट दिल्याचे एका दिवसापूर्वी उघड झाले होते. दोन्ही वेळा त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा दावा केला जात आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार या वर्षी ऑगस्टमध्ये G20 शिखर परिषदेदरम्यान भारतात ले होते. दोन्ही वेळा अजित डोवाल यांच्याशी त्यांची भेट झाली.

अहवालानुसार, अजित डोवाल यांच्या भेटीदरम्यान जोडी थॉमस यांनी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या कथित सहभागाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि तपासात सहकार्य मागितले होते. त्यानंतर भारतीय एनएसएने त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्याची मागणी केली होती, परंतु कॅनडा अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पुरावे देऊ शकले नाही. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची 18 जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर दोन सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

- Advertisement -

( हेही वाचा: Mathura Train Accident: मथुरा रेल्वे स्थानकावर भीषण अपघात; 30 मीटरपर्यंत प्लॅटफॉर्म तोडत … )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -