घरदेश-विदेशमी जातीवादाला मानत नाही, त्याचा पुरावा माझी पत्नी आहे - अखिलेश यादव

मी जातीवादाला मानत नाही, त्याचा पुरावा माझी पत्नी आहे – अखिलेश यादव

Subscribe

अखिलेश यादव यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाना साधाला. यावेळी त्यांनी भाजपवर जातीवादाचा गंभीर आरोप केला. याशिवाय आपण जातीवादाला जुमानत नाही, असे यादव म्हणाले.

‘मी जातीवरुन कधीच कुठल्याही प्रकारचे राजकारण करत नाही आणि या गोष्टीचा पुरावा माझी पत्नी स्वत: आहे. माझी पत्नी डिंपल यादव वेगळ्या जातीची आहे आणि मी वेगळा जातीचा’, असे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले आहेत. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपवर जातिवाद विषयावरुन सडकून टीका केली. यासोबतच भारतीय जनता पक्षाला थांबवण्यासाठी आपण बहुजन समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केल्याचे अखिलेश यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजप लोकांमध्ये जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला.

यादव रेजीमेंट का बनवले?

‘आपण जातिवादाला जुमानत नाही’, या  वक्तव्याचा धागा धरुन यादव रेजीमेंट का बनवली? असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी यात कुठल्याही प्रकारचे गैर नसल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मी एकदा गुजरातला गेलो होतो. तेव्हा तेथील अहिर समाजाने वेगळे रेजीमेंट बनवण्याची मागणी केली होती.’ या प्रश्नावर डिंपल यादव यांनी देखील उत्तर दिले. यादव रेजीमेंट का नको बनायला हवे? आता मी गर्हवाल समाजाची आहे, त्यामुळे मला गर्हवाल रेजीमेंटच्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत. काही समस्या किंवा मागण्यांसाठी एखादा समाज एकत्र आला आणि त्याची संघटना बनली तर यात काहीच गैर नाही. याचा जातिवाद असा अर्थ निघत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -