घरताज्या घडामोडीBharat Bandh : संपाचा पहिला दिवस यशस्वी ठरल्याचा संपकरी संघटनांचा दावा

Bharat Bandh : संपाचा पहिला दिवस यशस्वी ठरल्याचा संपकरी संघटनांचा दावा

Subscribe

अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटना (AIBEA) ने आज सरकारच्या विविध धोरणांबाबत भारत बंदची हाक दिली होती. दोन दिवसांच्या संपाच्या कालावधीतील पहिला दिवस हा यशस्वी ठरला आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात बॅंकिंग क्षेत्रासह अनेक कामगार संघटनांनी २८ मार्च आणि २९ मार्च अशा दोन दिवसांच्या संपाची हाक दिली होती. या संपातील पहिला दिवस यशस्वी ठरल्याचा दावा एआयबीईएने केला आहे.

सध्याच्या मार्च महिन्यात चौथ्या शनिवारमुळे २६ मार्चला बॅंकेचे काम बंद होते. त्यानंतरची रविवारची २७ मार्चची सुट्टी आणि सोमवार ते मंगळवार अशी दोन दिवसीय संपाची हाक यामुळे बॅंकांचे कामकाज ठप्प राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. एआयबीईएचे महासचिव सी एच वेंकटचलम यांनी केलेल्या दाव्यानुसार विदेशातील, क्षेत्रीय तसेच खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचाही या संपात सहभाग आहे. या संपाचा पहिला दिवस यशस्वी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

खाजगीकरणामुळे बॅंक कर्मचाऱ्यांची नाराजी

अनेक कर्मचारी हे खाजगीकरणामुळे नाखुश आहेत. लाखो कर्मचारी आणि अधिकारी हे अतिशय कठीण निवड पद्धतीच्या प्रक्रियेतून सरकारी बॅंकांमध्ये नोकरी मिळवतात. तर अनेक कर्मचारी हे आयटी आणि खाजगी क्षेत्रातून बाहेर पडत सुरक्षेसाठी सरकारी नोकरीची निवड करतात. त्यामुळे अशातच बॅंकांच्या खाजगीकरणाचा सरकारचा निर्णय हा अतिशय निराशाजनक आणि एक झटक्यासारखा असल्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे मत आहे. उद्या म्हणजे मंगळवारीही बॅंकांचा संप कायम राहणार असल्याचे वेंकटचलम यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -