घरदेश-विदेशगुजरातमध्ये काँग्रेसला दणका; अल्पेश ठाकोरने सोडला काँग्रेसचा हात

गुजरातमध्ये काँग्रेसला दणका; अल्पेश ठाकोरने सोडला काँग्रेसचा हात

Subscribe

गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचे वृत्त समोर आले असून ठाकोर आता हात सोडून भाजपचा हात पकडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणीकीची रणधुमाळी सुरु असतानाच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचे वृत्त समोर आले आहे. अल्पेश ठाकोर यांच्या जवळचे सहकारी धवल झाला यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला ही माहिती दिली आहे.

ठाकोरने हात सोडला

गेल्या काही दिवसांपासून अल्पेश ठाकोर काँग्रेसचा रामराम ठोकणार आणि भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र अल्पेश यांनी यावर स्पष्टीकरण देत ‘आपण काँग्रेसमध्येच राहून पार्टीला पाठिंबा देणार आहे आणि समाजाच्या हक्कासाठी लढणार असल्याचे’ सांगितले होते. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. परंतु त्यांचे अगदी जवळचे सहकारी धवल झाला यांनी आज ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याचे समजत आहे.

- Advertisement -

ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने आपल्याला दुर्लक्षित केल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केला होता. त्यामुळे नाराज अल्पेश ठाकोर भाजपाचा ‘हात’ पकडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी काँग्रेस आमदार हकुभा जडेजा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना देखील मंत्रीपद देण्यात आले होते.


हेही वाचा – देशातील २० राज्यांमध्ये उद्या होणार मतदान

- Advertisement -

हेही वाचा – कन्हैया कुमारच्या प्रचारात स्वराचे बर्थडे सेलिब्रेशन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -