घरमहाराष्ट्रमोदी v/s गांधी : विदर्भातील सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मोदी v/s गांधी : विदर्भातील सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Subscribe

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा उद्या, ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. देशातील तब्बल २० राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात विदर्भातील सात मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार असून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या. पंतप्रधान मोदी यांनी वर्धा आणि गोंदिया येथे सभा घेतल्या असून राहुल गांधी यांनी वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर येथे जनतेला संबोधित केले. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी घेण्यात आलेल्या या सभांमध्ये दोनही दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील भाषणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना प्रामुख्याने ‘टार्गेट’ केले. तर गोंदियातील भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला. तर राहुल गांधी यांनीही राफेलपासून सर्जिकल स्ट्राईकपर्यंत सर्व मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी आणि आघाडीविरोधातील मुद्दे –

नरेंद्र मोदींची वर्धा येथील सभा

- Advertisement -
  • जाणते नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली
  • याचा अर्थ यंदा मतदारांचा कल कोणत्या दिशेला आहे हे त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने ओळखले आहे
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कौंटुंबिक कलहातून शरद पवारांच्या हातातून निसटत आहे
  • पवारांचे राजकारण भल्याभल्यांनही समजले नाही

नरेंद्र मोदींची गोंदिया येथील सभा

  • महायुती विरोधकांची महामिलावट साफ करेल
  • याआधी शेतकरी, तरुणवर्गही चिंतेत होता
  • लोक बालाकोटमधील कारवाई विसरले नाहीत
  • पाच वर्षांत यूपीएच्या चुका निस्तरल्या
  • देशद्रोह रद्द करू पाहणाऱ्यांना संधी देणार का?
  • काँग्रेस देशात अस्थिरता निर्माण करत आहे
  • काँग्रेसचा जाहीरनामा जवानांचा अवमान

मोदी सरकारवरील टीका –

राहुल गांधींची नागपूरमधील सभा

- Advertisement -
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं.
  • पंधरा लाख मिळाले का?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले खोटे आश्वासन खरे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय
  • खोट बोलणाऱ्याचे संबंध काही दिवसांचे असतात. मला पंधरा वीस वर्ष लोकांसोबत काम करायचे आहे. त्यामुळे मी खोटी आश्वासने देत नाही
  • आम्ही याआधी १४ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले
  • उद्योगपतींच्या खात्यात पैसै टाकताना का विचारत नाही की पैसै कुठून येणार
  • निवडणुकीनंतर चौकीदार जेलमध्ये असेल
  • राफेलप्रकरणी निवडणुकीनंतर चौकशी होईल आणि नंतर चौकीदार जेलमध्ये असेल

राहुल गांधींची वर्ध्यातील सभा 

  • मोदी केवळ अंबानी, चोक्सींनाच आलिंगन देतात. शेतकऱ्यांना आलिंगन देताना मोदींचा एकतरी फोटो दाखवा
  • पुलवामा घटनेनंतरच्या एअर स्ट्राइकचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत मोदी करीत आहेत
  • मोदींनी एकदा रायफल तरी धरून दाखवावी
  • मोदींनी नेमके काय केले ते मी सांगतो, चौकीदार बनून त्यांनी त्यांचे मालक अनिल अंबानींना फ्रान्समध्ये नेण्याचे काम केले

राहुल गांधींची चंद्रपूरातील सभा 

  • नीरव मोदी, अनिल अंबानी, विजय मल्ल्या यांनी पैसे बुडविले. ते पैशांची परतफेड करीत नाही म्हणून जेलमध्ये जात नाहीत. विदर्भातील शेतकऱ्यांनी कर्जाच्या पैशांची परतफेड केली नाही, तर त्यांना मोदी सरकार तुरुंगात पाठवते
  • मोदी सरकार नेहमी सांगितले की, पैशांची कमतरता आहे. शेतकऱ्याला पैसा दिला जाऊ शकत नाही. युवकांना बँकेचे कर्ज मिळत नाही. पैशांची कमतरता नाही. या सरकारने केवळ मोठमोठ्या गोष्टी केल्या. आश्वासने पूर्ण केली नाहीत
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हिंदुस्थान बनवायचे आहे. एक श्रीमंताचा हिंदुस्थान आणि दुसरा गरिबांचा

हेही वाचा –

देशातील २० राज्यांमध्ये उद्या होणार मतदान

मतदानाच्या तोंडावरच इम्रान म्हणाले, पुन्हा मोदी हवेत

#Rafale Scam : नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -