घरदेश-विदेशCorona: व्हेन्टिलेटरवर ३२ दिवसांपासून होता पती, अवघे काही तास भेटला पत्नीला आणि...

Corona: व्हेन्टिलेटरवर ३२ दिवसांपासून होता पती, अवघे काही तास भेटला पत्नीला आणि…

Subscribe

कोणत्याही रोगावर मात करण्यासाठी प्रेम आणि विश्वास पुरेसं असतं, याचे हे उत्तम उदाहरण

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहेत. अमेरिकेत कोरोना रुग्ण आणि डॉक्टर यांची परिस्थिती वाईट आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान, डॉक्टरांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. उत्तम उपचारांच्या सुविधा असूनही, अमेरिकेत कोरोनामुळे 56 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, या सगळ्या परिस्थितीत एका कोरोना रुग्णाला मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणण्यात आले आहे.

त्याच्या जगण्याची आशा डॉक्टरांनी सोडली होती

अमेरिकेचा मॅसेच्युसेट्सचा रहिवासी असलेल्या 49 वर्षीय जिम बेलो हा व्यवसायाने वकील असून त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. याआधी जिमला कधीच कोणता आजार झाला नसून तो तंदुरूस्त होता. मात्र कोरोनामुळं त्याची परिस्थिती अधिक बिकट झाली. यामुळे डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती. तीन मुलांचा वडील असलेल्या जिमवर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मार्चच्या सुरूवातीला त्याला प्रचंड ताप आल्याने तो ३२ दिवस व्हेन्टिलेटरवर होता. यावेळी, त्याला कृत्रिम हार्ट-लंग मशीनच्या सहाय्याने 9 दिवस जिवंत ठेवण्यात आले.

- Advertisement -

पत्नीला १५ मिनिटे भेटण्यास दिली परवानगी

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार,’जगण्याची शक्यता आहे मात्र जास्त आशाही नाही आहेत’, असे डॉ एम्मी रुबिन यांनी जिमची पत्नी किमला सांगितले. जिमच्या फुफ्फुसांनी जवळजवळ काम करणे बंद केले होते. यावेळी डॉक्टर सांगितले की, त्याच्या फुफ्फुसाचा एक्स-रे पाहिल्यानंतर त्यांना कळले की जिम जगू शकत नाही. सगळे उपाय करूनही जिमच्या तब्येतीत काही फरक नव्हता. जेव्हा जिमची तब्येत नाजूक झाली तेव्हा डॉक्टरांनी त्यांची पत्नी किमला बोलवून घेतले आणि पतीची भेट घेण्यास सांगितले.

…आणि चमत्कारच घडला

डॉक्टरांनी जिमला भेटण्यासाठी किमला केवळ 15 मिनिटे परवानगी दिली. मात्र किम तीन तास जिमसोबत होती. या भेटीनंतर जणू चमत्कार घडला आणि जिमची तब्येत सुधारण्यास सुरुवात झाली. “किमच्या प्रेमानं जिमला वाचवलं. ती 3 तास जिमजवळ बसून होती, तिचा आत्मविश्वास खरं औषध आहे”,असे पॉल कुरियर या डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

जिमनं पत्नीची भेट घेतल्यानंतर त्याची प्रकृती सुधारण्यास सुरूवात झाली. अखेर 14 एप्रिल रोजी जिमला व्हेन्टिलेटरवरून काढले आणि स्वत: श्वास घेऊ लागल्यानंतर डॉक्टरांनी जिमला डिस्चार्ज दिला आहे.


Video: मुलाच्या अंगावर कपड्यांऐवजी प्लास्टिकची पिशवी; जन्मदात्या आईची ‘ही’ मागणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -