जिनपिंग यांच्या आदेशानंतरच लडाखमध्ये घुसले चीनी सैनिक

Chinese troops entered Ladakh only after Jinping's order

पूर्व लडाख सीमेवर चीनी सैन्याने केलेली घुसखोरी ही चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या सांगण्यावरुन केली होती. याबाबतची माहिती अमेरिकेचे प्रतिष्ठीत मासिक न्यूजवीकच्या ताज्या अंकात छापून आली आहे. भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिल्याने जिनपिंग यांची चाल फ्लॉप ठरली. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाले, तर भारतीय जवानाने प्रत्युत्तरात कमीतकमी ४३ चीनी सैनिक ठार झाले, तर त्यांची संख्याही ६० असू शकते. भारताच्या या अनपेक्षित प्रतिसादाने चीनची ही कारवाई फ्लॉप झाल्याचं सिद्ध झालं.

अमेरिकेचे प्रतिष्ठीत मासिक न्यूजवीक यांनी आपल्या ताज्या अंकात याबाबतची माहिती दिली आहे. मासिकामध्ये लिहिलं आहे की, चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. यामुळे जिनपिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. भारतीय सीमेवर चिनी लष्कराच्या अपयशाचे दूरगामी परिणाम होतील. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या समर्थनानेच लडाख सीमेवर चीन भारताविरोधात आक्रमकता दाखवत आहे. पण त्यांची पीपल्स लिबरेशन आर्मी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असं न्यूजवीकमध्ये म्हटलं आहे.

चीनने भारताविरोधात जो आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यामागे शी जिनपिंग यांची खेळी आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय प्रदेशात घुसखोरीचा निर्णय घेऊन, स्वत:च्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने मोठा धोका पत्करला आहे. भारतीय सैन्याने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे जिनपिंग यांची चाल फ्लॉप ठरली आहे, असं न्यूजवीकमध्ये म्हटलं आहे.