घरदेश-विदेशमीरा रोडचे कौस्तुभ राणे जम्मू-काश्मीरच्या चकमकीत शहीद

मीरा रोडचे कौस्तुभ राणे जम्मू-काश्मीरच्या चकमकीत शहीद

Subscribe

पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. काल मध्यरात्री ८ दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. दरम्यान जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले तर एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये ८ दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. दरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये २ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. मात्र या चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद झाले. दरम्यान नियंत्रण रेषेजवळच्या भागामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश

गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सोमवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली असता जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केली. त्यावेळी जवानांना घुसखोरी करणारे ८ दहशतवादी दिसले. जवानांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. अजूनही चकमक सुरु आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर के. पी. राणेंना वीरमरण

चकमकी दरम्यान भारताचे चार जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये एका मेजरचा समावेश आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर के. पी. राणे, जवान मनप्रितसिंग रावत, जवान हमीर सिंग आणि रायफलमॅन विक्रमजीत सिंग यांना वीरमरण आले. या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात जवानांची फौज गुजेर सेक्टरमध्ये पाठवण्यात आली आहे. सध्या या सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा एजन्सींनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दहशतवादी घुसखोरी होण्याचा अलर्ट दिला होता. त्यामध्येच रविवारी दिल्लीला ८ ग्रेनेड घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -