घरफोटोगॅलरीPHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा

PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा

Subscribe

हैदराबाद : आयपीएल 2024 स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद आणइ राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये चुरशीची लढत झाली. सनरायझर्स हैदराबाद संघाने अवघ्या 1 धावेने रायस्थान रॉयल्सवर विजय मिळविला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले होते, या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल संघाला निर्धारित 20 षटकांत 200 धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरने मारलेला षटकार या मोसमातील दुसरा सर्वात मोठा षटकार ठरला.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरने डावाच्या 18व्या षटकात टी नटराजनच्या चेंडूवर मारलेला षटकार 106 मीटर लांब गेला.

- Advertisement -

आयपीएल 2024मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिनेश कार्तिकच्या नावावर आहे, कार्तिकने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध टी नटराजनच्याच चेंडूवर 108 मीटर लांब षटकारही मारला.

सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत एकूण 4 फलंदाजांनी 106 मीटर लांब षटकार ठोकले आहेत. शिमरॉन हेटमायर व्यतिरिक्त, सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन, कोलकाता नाइट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर आणि लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन यांचा यात समावेश आहे.

या यादीत मुंबई इंडियन्सच्या इशान किशनचाही समावेश असून त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 103 मीटर षटकार मारला होता.

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू एलबी मॉर्केलच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम आहे. पहिल्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना मॉर्केलने डेक्कन चार्जर संघातील प्रज्ञान ओझाच्या चेंडूवर 125 मीटर लांब षटकार मारला होता.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -