घरताज्या घडामोडीZoom Call वर ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या कंपनीच्या CEO ला आनंद महिंद्रा...

Zoom Call वर ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या कंपनीच्या CEO ला आनंद महिंद्रा यांचा सवाल, म्हणाले…

Subscribe

एकदम ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याआधी त्यांना एक संधी द्यायली हवी होती

अमेरिकेच्या बेटर डॉट कॉम कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी झूम मिटींगवर कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर त्यांच्यावर अनेक स्थरातून टीकेची झोड उठली. सोशल मीडियावर देखील हा चर्चेचा विषय बनला. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील या प्रकरणावर आपला संताप व्यक्त करत कंपनीच्या सीईओला खडा सवाल केला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत विशाल गर्ग यांना म्हटले आहे की, ‘एकदम ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याआधी त्यांना एक संधी द्यायली हवी होती. मी एक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्साही आहे की तुम्हाला असे वाटते की अशा चुकीनंतर सीईओ टिकू शकतो का?’

- Advertisement -

आनंद महिंद्रा हे ट्विटरवर प्रचंड सक्रीय असतात. ट्विटर त्यांचे ८.५ फॉलोअर्स आहेत. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. ‘एक लीडर होण्यासाठी आवश्यक असलेली सहानुभूती गर्ग यांच्याकडे आहे की नाही? चूक झाल्यावर सुधारण्यासाठी एक संधी प्रत्येक ठिकाणी दिली जाते’,अशी कमेंट एका युझरने केली आहे.

विशाल गर्ग यांच्या या निर्णयावर प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी देखील संताप व्यक्त केला होता. ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याने मला फार वाईट वाटत असून गर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना समोरासमोर बसून त्यांना हा निर्णय सांगायला हवा होता असे म्हटले होते. त्याचप्रमाणे हर्ष गोयंका यांनी कंपनीला सध्या ७५० मिलियन अमेरिकी डॉलर्सचा नफा झालेला असताना कंपनीने ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले असा खुलासा देखील केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Zoom Call वर ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या CEO वर हर्ष गोएंका भडकले,कंपनीबाबत केला मोठा खुलासा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -