घरदेश-विदेशAnju Nasrullah Wedding : अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून प्रियकराशी निकाहही केला; पाक...

Anju Nasrullah Wedding : अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून प्रियकराशी निकाहही केला; पाक मीडियाचा दावा

Subscribe

Anju Nasrullah Wedding : पाकिस्तानातून (Pakistan) सीमा हैदर (Seema Haider) ही महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी बेकायदेशीररित्या भारतात आली. त्यामुळे एटीएसकडून तिची  चौकशी सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच आता भारतीय तरुणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्ताना गेल्याची माहिती समोर आली. राजस्थानमधील अंजू (Anju) ही तरुणी 90 दिवसांचा व्हिसा घेऊन वाघा बॉर्डरद्वारे (Wagha Border) पाकिस्तानमध्ये गेली आहे. यानंतर अंजूबाबत मोठी बातमी समोर येत आहे. तिने इस्लाम धर्म स्विकारला असून पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाहशी निकाह (Anju Nasrullah Wedding) केल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला आहे. (Anju Nasrullah Wedding Anju converted to Islam and got married to her boyfriend Pakistani media claim)

हेही वाचा – Video : देश आर्थिक संकटात; सोन्याच्या विटांनी मुलीचा तुला करणारा पाकिस्तानी उद्योगपती ट्रोल

- Advertisement -

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहणाऱ्या अंजूचे फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर प्रेम जडले. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये राहणाऱ्या नसरुल्लाह या तरुणाला भेटण्यासाठी अंजू व्हिसा घेऊन गेली आहे. पण तिने निकाह केल्याची माहिती पाकिस्तानी मीडियामध्ये येत आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार नसरुल्ला आणि अंजू यांचा निकाह जिल्हा न्यायालयात, अप्पर दीरमध्ये औपचारिकरित्या पार पडला. अंजू अप्पर दीर ​​जिल्हा न्यायालयात काळा बुरखा घालून हजर असल्याची माहिती मीडियाने दिली आहे.

- Advertisement -

सत्र न्यायाधीश न्यायालयात पार पडला निकाह

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार मलाकंद विभागाचे उपमहानिरीक्षक नासिर मेहमूद सत्ती यांनी अंजू आणि नसरुल्लाच्या निकाहाला दुजोरा दिला आहे. सत्ती यांनी सांगितले की, जिल्हा पोलीस प्रमुखांनी या दोघांचा निकाह जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात लावण्यात आला आहे. निकाहानंतर अंजू आणि नसरुल्लाच्या सुरक्षिततेसाठी त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात घरी सोडण्यात आले. नासिर मेहमूद स्तती यांनी सांगितले की, अंजूने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करताना सांगितले की, मी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने ख्रिश्चन धर्मातून इस्लाम स्वीकारत आहे. निकाहच्या अटींनुसार तिचा 10 तोला सोन्याचा हक-मेहर (मेहर) निश्चित करण्यात आला असल्याचेही अंजूने सांगितले.

हेही वाचा – SIMI Ban विरोधातील याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; काय आहे कारण?

अंजू आणि नसरुल्लाहाचा व्हिडिओ आला समोर

अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर तिचा आणि तिच्या प्रियकराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ‘अंजू वेड्स नसरुल्ला’ नावाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही हात धरून फिरताना आणि एकमेकांच्या जवळ बसलेले दिसत आहेत. याआधी दोघांनी निकाहाचा कोणताही विचार नसल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या निकाहाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहणारी अंजू ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत. दोन्ही मुले तिचा पती अरविंदसोबत राहतात. अंजू आणि अरविंद यांचा विवाह 2007 मध्ये झाला होता. 21 जुलै रोजी अंजू अचानक घरातून निघून गेल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -