घरदेश-विदेशनसरुल्लाहच्या प्रेमात पाकिस्तानला पोहोचलेली अंजू लवकरच परतणार भारतात; काय आहे कारण?

नसरुल्लाहच्या प्रेमात पाकिस्तानला पोहोचलेली अंजू लवकरच परतणार भारतात; काय आहे कारण?

Subscribe

नवी दिल्ली : राजस्थानच्या भिवडी येथे राहणारी अंजू पती आणि मुलांना सोडून यावर्षी जुलैमध्ये प्रेमासाठी पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने पाकिस्तानच्या नसरुल्लाला भेटायला आल्याचे सांगितले. तसेच नसरुल्लालला फेसबुकवर भेटल्यावर प्रेमात पडल्याचे आणि त्यानंतर पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतल्याचे अंजूने सांगितले होते. आता जवळपास तीन महिन्यांनंतर अंजू पाकिस्तानमधून भारतात परतत आहे. ती ऑक्टोबरच्या अखेरीस भारतात परतणार असल्याचे समजते. (Anju who reached Pakistan in love with Nasrullah will soon return to India What is the reason)

हेही वाचा – सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांपाठोपाठ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी Good News; दिवाळीत मिळणार बक्कळ बोनस

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीने अंजूशी संवाद साधल्यानंतर दावा केला आहे की, आपल्या मुलांसाठी ती भारतात परतत आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि भारतात परतल्यानंतर ती सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असेही वृत्तवाहिनीने स्पष्ट केले आहे. अंजूने वृत्तवाहिनीला सांगितले की, तिची पाकिस्तानमधील व्हिसाची मर्यादा संपुष्टात येत आहे, परंतु ही मर्यादा ती वाढवू इच्छित नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तिची भारतात असलेली मुले. तिला भारतात परतायचे आहे आणि मुलांसोबत राहायचे आहे. पतीसोबतचे नाते संपुष्टात आल्याचे अंजूने आधीच स्पष्ट केले आहे.

अंजू वृत्तवाहिनीला सांगितले की, तिने कधीही कोणापासून काहीही लपवले नाही. पाकिस्तानात पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बहिणीला फोन केला. आई-वडिलांशीही बोलले. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. विशेष करून देशाच्या सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईल. माझा हेतू चुकीचा नव्हता. पाकिस्तानात मी पूर्णपणे कायदेशीररित्या आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – युद्धादरम्यान जो बायडेन इस्रायलला पोहोचले; जगाला दिला संदेश, काय आहे त्यांची योजना?

कोण आहे अंजू?

मूळची यूपीची असलेल्या अंजूचे 2007 मध्ये राजस्थानमध्ये लग्न झाले. 34 वर्षीय अंजूला दोन मुले आहेत. यावर्षी अंजू सोशल मीडियावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाहच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर ती पाकिस्तानात पोहोचली. अंजूने परदेशात नोकरीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी पासपोर्ट बनवला होता आणि त्यानंतर यावर्षी ती कुणाला काहीही न सांगता पाकिस्तानचा व्हिसा मिळवून निघून गेली. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर दोन्ही देशांच्या माध्यमांमध्ये ती प्रसिद्ध झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -