घरदेश-विदेशपाटण्यामध्ये नमाजानंतर 'अतिक अहमद अमर रहे' च्या घोषणा, पोलीस सतर्क

पाटण्यामध्ये नमाजानंतर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा, पोलीस सतर्क

Subscribe

नवी दिल्ली : बिहारच्या पाटणामध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोकांनी अतिक अहमदच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. ‘अतिक अहमद अमर रहें’च्या घोषणा देताना ‘मोदी-योगी मुर्दाबाद’च्या घोषणाही लोकांकडून देण्यात आल्या. ही घटना पटना स्टेशनजवळील जामा मशिदीच्या जवळची आहे. रोजेदार निरोपाची प्रार्थना करण्यासाठी लोक या ठिकाणी पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार पटना जंक्शनजवळील मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर लोक निघत असताना काही यूट्यूबर्सनी यूपीच्या अतिक अहमद आणि अशरफ यांच्या शूटआउट त्यांचे मत विचारले. यावेळी काही लोकांनी ‘अतीक अहमद अमर रहे’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी ‘मोदी-योगी मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.

- Advertisement -

अतिक हत्येनंतर यूपी पोलीस-प्रशासनाची कडक सुरक्षा व्यवस्था
अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर यूपी पोलीस प्रशासनाने निरोपाच्या नमाजासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. नमाजानंतर कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद साधला होता. पोलीस आणि गुप्तचर विभाग मोठ्या प्रमाणात सर्वत्र तपासणी करत आहे. दक्षतेसाठी ग्रामीण आणि शहर परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या ईद असल्याने आज पोलिसांची रंगीत तालीम होणार आहे. यूपीमध्ये रस्त्यावर नमाज अदा होणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, असे असतानाही आज अतिक अहमदच्या समर्थनार्थ घोषणेमुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

- Advertisement -

अतिक अहमद आणि अशरफ यांची १५ एप्रिल रोजी हत्या
प्रयागराजमध्ये शनिवारी (15 एप्रिल) रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची तीन आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या बाहेर पत्रकारांच्या वेषात आलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघां भावावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना पकडले आहे. या घटनेच्या दोन दिवस आधी अतिकच्या मुलाचे पोलिसांनी एन्काउंटर केले होते. यूपीच्या झांसी जिल्ह्यात गुरुवारी (13 एप्रिल) यूपी एसटीएफने अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काउंटर केला होता, त्यात शूटर गुलामही मारला गेला होता.

महाराष्ट्रातील बीडमध्येही अतिकच्या समर्थनार्थ पोस्टर
माफीया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव चौकात पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरवर अतिक अहमदचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी पोस्टर हटवले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -