घरदेश-विदेशअतिकच्या हत्येत गॅंगस्टर सुंदर भाटीचे कनेक्शन? गोळीबारासाठी पिस्तुल दिल्याचा संशय

अतिकच्या हत्येत गॅंगस्टर सुंदर भाटीचे कनेक्शन? गोळीबारासाठी पिस्तुल दिल्याचा संशय

Subscribe

नवी दिल्लीः  अतिक अहमदच्या हत्येप्रकरणातील आरोपी सनी सिंह पश्चिम उत्तर प्रदेशमधील गॅंगस्टर सुंदर भाटीसाठी काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे. हमीरपूर कारागृहात असताना सनी आणि सुंदरची भेट झाली. कारागृहातून सुटल्यानंतर सनी हा सुंदरसाठी काम करत होता. ज्या बंदुकीने अतिकची हत्या करण्यात आली. ती बंदुक सुंदरने सनीला दिल्याचे वृत्त आहे.

सुंदरविरोधात ६० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सुंदरविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, अशा गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे. हरेंद्र प्रधान हत्येप्रकरणी गेल्या वर्षी सुंदरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो सोनभद्र कारागृहात आहे. त्याआधी सुंदर हमीरपूर कारागृहात होता. त्या कारागृहात सुंदर आणि सनीची भेट झाली. कारागृहातून सुटल्यानंतर सनी सुंदरसाठी काम करत होता. अतिकच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक सुंदरनेच सनीला दिल्याची माहिती समोर आली आहे. सुंदरकडे एके-४७ व अन्य हत्यारे आहेत. पंजाबमधील अनेक तस्कर सुंदरच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.

- Advertisement -

दरम्यान, गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफच्या हत्येची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०१७ पासून झालेल्या एन्काउंटरचीही निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अतिकचे वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०१७ पासून आतापर्यंत  १८३ एन्काउंटर झाले आहेत. या सर्व एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षततेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

- Advertisement -

अतिक आणि अशरफच्या हत्येवरुन राजकीय वातावरण तापले आहे. सर्वस्तरातून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यामुळे या याचिकेवर न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अतिक आणि अशरफला वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्यावर अचानक गोळीबार झाला. संपूर्ण मीडिया तेथे होता. त्यांच्यासमोर हा हल्ला झाला. त्यामुळे हा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. या हल्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -