घरदेश-विदेशBaba Bageshwar : बाबा बागेश्वर यांच्या प्रवचनात मारामारी; बाऊन्सरने भक्ताला कानाखाली मारल्याने...

Baba Bageshwar : बाबा बागेश्वर यांच्या प्रवचनात मारामारी; बाऊन्सरने भक्ताला कानाखाली मारल्याने झाला वाद

Subscribe

Baba Bageshwar : ग्रेटर नोएडातील जैतपूर येथे बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक राज्यांतून कथा ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. परंतु या कार्यक्रमाला वादाची लागली आहे. बाऊन्सरने बाबा बागेश्वर यांच्या एका भक्ताला मारहाण केल्याचे समोर येत आहे. (Baba Bageshwar Fighting in Baba Bageshwars discourse An argument ensued when the bouncer hit the devotee under the ear)

हेही वाचा – Delhi Crime : दिल्लीत श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती! महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले

- Advertisement -

जैतपूर मेट्रो डेपोजवळ सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा बाऊन्सरने बाबा बागेश्वर यांच्या एका भक्ताला मारहाण केली. बाऊन्सरने भक्ताला एकापाठोपाठ सात वेळा कानाखाली मारली. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भांडण सुरू असताना त्याठिकाणी पोलिसही उपस्थित होते. त्यांनी बाऊन्सरला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे भक्तांकडून बाऊन्सर तसेच पोलिसांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची आता सूरजपूर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

भागवत कथेसाठी 58231 हजारांहून अधिक भक्तांची उपस्थिती

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे ग्रेटर नोएडामध्ये आयोजन करण्यात आले आहे. जैतपूर मेट्रो डेपोजवळ 10 जुलैपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भागवत कथा सुरू आहे. ही कथा 16 जुलैपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होत आहे. 58231 हजारांहून अधिक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. दरबारात भाविकांच्या सुरक्षेसाठी तबब्ल 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बाबा बागेश्वर यांचे सिंहासन सहारनपूर येथून आले आहे. स्टेज सजवण्यासाठी कार्पेट जम्मू येथून तर फुले वृंदावनातून आली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सिनेमागृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, तर ऑनलाइन गेमिंग महागणार; GST परिषदेचे महत्वाचे निर्णय

भारतात रामराज्य स्थापन होईल

जैतपूर मेट्रो डेपोजवळ सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदूंचा छळ करणाऱ्यांना बांधून ठेवावे लागेल. एका घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, एका शाळेत विद्यार्थ्यांना कपाळावर टिळक लावण्यासाठी थांबवण्यात आले. मंदिरात जाऊन रामायण वाचणेही येत्या काळात बंद होणार आहे. अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले जाईल. भागवत कथा ऐकण्यासाठी आलेल्या भक्तांना तसेच त्यांच्या मुलांच्या कपाळावर टिळक लावून त्यांना रामचरित मानस पठण करण्यास सांगितले. लक्षात ठेवा, भारतासारखे राष्ट्र पुन्हा भेटणार नाही. मी कोणाच्याही विरोधात नाही, पण लोकांना जागे करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना जागे केल्यानंतर निघून जाईल, असे धीरेंद्र शास्त्री यांनी उपस्थित भक्तांना संबोधित करताना वक्तव्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -