घरताज्या घडामोडीनितेश राणेंना 'ते' ट्वीट भोवणार, तृतीयपंथी नाराज, गुन्हा दाखल करण्याची मागणी

नितेश राणेंना ‘ते’ ट्वीट भोवणार, तृतीयपंथी नाराज, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत नागपूरला लागलेला कलंक असं म्हटलं होतं. परंतु त्यांच्या या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून ठाकरेंवरही पलटवार केले जात आहेत. यावरूनच टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख आणि मर्दानगी वर कलंक असा केला होता. त्यावरून आता तृतीयपंथी समाज नाराज झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तृतीयपंथीयांकडून करण्यात येत आहे.

नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट केलं होतं. उद्धव ठाकरेंचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. तसेच ‘मर्दानगी वर कलंक ! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!’ अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर तृतीयपंथीय समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील काही आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील, निकिता मुख्यदल यांनी आंदोलन सुरु केलं आहे. हिजडा या शब्दाला सामुदायिक आणि सांस्कृतिक अशी ओळख आहे. उच्च न्यायालयाने आम्हाला तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली आहे. मग तुम्ही हिजडा या शिवीचा वापर कशासाठी करत आहात? असा सवाल निकिता मुख्यदल यांनी उपस्थित केला.

नितेश राणेंना सोज्वळपणा, बोलण्याची पद्धत शिकायची असेल तर चार दिवस आम्हा हिजड्यांच्या मध्ये येऊन राहा, असा घणाघात देखील तृतीयपंथीय आंदोलकांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे. तसेच या आंदोलनापूर्वी नितेश राणे जिथं दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळ फासू, असा गंभीर इशाराही या आंदोलनकर्त्यांनी राणेंना दिला आहे.

- Advertisement -

नितेश राणेंची सारवासारव 

काल माझ्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेऊन मी वक्तव्य केलं. काँग्रेसच्या समोर झुकणारे सर्वजण हिजडे असतात, असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्याच वक्तव्याचा आधार घेऊन मी उद्धव ठाकरेंना हिजड्यांचा प्रमुख म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वक्तव्य करण्यामागे माझा हाच राजकीय हेतू होता. त्यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा प्रयत्न नव्हता, असं नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.


हेही वाचा : ते स्वत: कलंकित, सत्ता गेल्यामुळे बेताल वक्तव्य; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -