घरदेश-विदेश५ दिवस बँका राहणार बंद!

५ दिवस बँका राहणार बंद!

Subscribe

जर तुम्हाला बँकेचे काही व्यवहार करायचे असतील तर करुन घ्या. कारण ५ दिवस बँका बंद राहणार म्हटल्यावर कॅशचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर आता नवरात्र सणही तोंडावर आला आहे. या सणासुदीच्या दिवसात पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेचे काही व्यवहार करायचे असतील तर करुन घ्या. कारण ५ दिवस बँका बंद राहणार म्हटल्यावर कॅशचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

कधी आहेत बँका बंद?

बँकांशी संबंधित असणारे कोणतेही काम येत्या २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी. कारण येत्या २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत देशभरातील बँका बंद राहणार असून, थेट ३० सप्टेंबरला बँका उघडणार आहेत,असे असले तरी, अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसल्याने ग्राहकांना थेट १ ऑक्टोबरला बँकांची पायरी चढावी लागणार आहे.

- Advertisement -

यासाठी बँका राहणार बंद

बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संपाची घोषणा केली असल्याने २६ आणि २७ सप्टेंबरला देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचा ऐन सणासुदीला खोळंबा होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनाकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बँकांचे कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. २८ आणि २९ सप्टेंबरला शेवटचा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे २५ सप्टेंबरनंतर बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. ३० सप्टेंबरला बँका उघडणार असल्या तरी देखील अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसल्याने ग्राहकांना १ ऑक्टोबरला आपले काम करावे लागणार आहे.

५ दिवस बँका बंद

  • २६ आणि २७ सप्टेंबर : विलीनीकरणविरोधात संप
  • २८ सप्टेंबर : चौथा शनिवार
  • २९ सप्टेंबर : रविवार
  • ३० सप्टेंबर : अर्धवार्षिक हिशेब

कॅश मिळणे कठीण

इतके दिवस बँका बंद असणार म्हटल्यावर त्याचा परिणाम कॅशवर देखील होणार आहे. कारण सणासुदीच्या दिवसात घरात कॅश लागते त्यामुळे आधीच थोडी कॅश काढून ठेवा.

- Advertisement -

हेही वाचा – देना बँकेचे मुख्यालय विक्रीला


एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -