घरदेश-विदेशAditya L1 संदर्भात मोठे अपडेट; 6 जानेवारीला L1 बिंदूवर पोहोचणार, ISRO ची...

Aditya L1 संदर्भात मोठे अपडेट; 6 जानेवारीला L1 बिंदूवर पोहोचणार, ISRO ची माहिती

Subscribe

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी गुरुवारी आदित्य एल1 मोहिमेबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. त्यांनी सांगितले की, आदित्य L1 6 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता L1 (लॅग्रेंज 1) बिंदूवर हॅलो कक्षेत पोहोचेल.

मुंबई: भारताच्या सौर मोहिमेने सर्वात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी गुरुवारी आदित्य एल1 मोहिमेबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. त्यांनी सांगितले की, आदित्य L1 6 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता L1 (लॅग्रेंज 1) बिंदूवर हॅलो कक्षेत पोहोचेल. ते म्हणाले की, वाहन कक्षेत प्रवेश करण्यासाठी आदित्य L1 चे इंजिन अतिशय नियंत्रित पद्धतीने चालवले जाईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे यांच्या वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम टेकफेस्ट 2023 मध्ये गुरुवारी मुंबईत इस्रोचे प्रमुख बोलत होते. (Big update regarding Aditya L1 It will reach the L1 point on January 6 according to ISRO)

L1 बिंदू हे असं ठिकाण आहे जिथे पृथ्वी आणि सूर्य या दोन ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामध्ये संतुलन आहे. हा बिंदू पृथ्वीपासून सुमारे 3.5 लाख किलोमीटर दूर आहे. सोमनाथ म्हणाले की, सौर वाहनाचे सर्व सहा पेलोड तपासले गेले आहेत आणि ते योग्यरित्या कार्यरत आहेत. आम्हाला प्रत्येकाकडून खूप चांगला डेटा मिळत आहे. ते म्हणाले की, L1 बिंदूवर पोहोचल्यानंतर आदित्य L1 आणि सूर्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. जोपर्यंत सोलर व्हेईकलचे इलेक्ट्रॉनिक्स काम करते तोपर्यंत ते सूर्याचे निरीक्षण आणि अभ्यास करत राहील.

- Advertisement -

ही सौर मोहीम आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर सूर्याचे वातावरण, त्यावर निर्माण होणारी चुंबकीय वादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर अभ्यास केला जाईल, अशी आशा सोमनाथन यांनी व्यक्त केली. हे अंतराळयान कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) आणि इंटरप्लॅनेटरी मॅग्नेटिक फील्ड यांसारख्या विविध घटनांची माहिती देखील गोळा करेल. हे केवळ भारतालाच नाही तर जगभरातील वैज्ञानिक समुदायाला महत्त्वाचा डेटा प्रदान करेल.

सोमनाथन म्हणाले की, दुर्दैवाने प्रज्ञान पुन्हा सक्रिय झाला नाही भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान-3 बाबत ते म्हणाले की, 14 दिवस सक्रियपणे डेटा गोळा केल्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गाढ झोपी गेला. चंद्राच्या पृष्ठभागावरील उणे -100 अंश सेल्सिअस तापमानात प्रज्ञानला पुन्हा सक्रिय होता आले नाही. आम्हाला आशा होती की प्रज्ञान पुन्हा एकदा सक्रिय होईल, पण तसे झाले नाही. ते म्हणाले की, जेव्हा आम्ही प्रज्ञानाच्या सर्व यंत्रणांची चाचणी घेतली तेव्हा ते 14 दिवसांनंतरही काम करत होते, परंतु प्रयोगशाळेत काम करणाऱ्या प्रणाली चंद्राच्या पृष्ठभागावर काम करू शकत नव्हत्या.

- Advertisement -

पाच वर्षांत 50 उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी…

इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ म्हणाले की, भारत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी पुढील पाच वर्षांत 50 उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या अंतर्गत, सैन्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आणि हजारो किलोमीटर क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कक्षांमध्ये अतिरिक्त उपग्रह स्थापित केले जातील. तंत्रज्ञानानुसार उपग्रहांची क्षमता सुधारणे आवश्यक असल्याचे इस्रो प्रमुख म्हणाले. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा आधारित दृष्टीकोन अवलंबून विश्लेषणासाठी आवश्यक माहिती मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

(हेही वाचा: Chanda Kochhar पुन्हा अडचणीत; टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -