घरCORONA UPDATEलॉकडाऊनची ऐशी तैशी; कुठे आमदाराची बिर्याणी पार्टी, तर कुठे पैसे वाटप

लॉकडाऊनची ऐशी तैशी; कुठे आमदाराची बिर्याणी पार्टी, तर कुठे पैसे वाटप

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात कर्नाटक आणि झारखंडमध्ये आमदारांकडूनच नियमांचे उल्लंघन होतानाची उदाहरण समोर आली आहेत.

एकीकडे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकार, पोलीस प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील लोकप्रतिनिधीच या नियमांना बगल देत असल्याची उदाहरणं पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या नियमाला धुडकावून लावणारी अशीच एक घटना कर्नाटकातून समोर येत आहे. कर्नाटकमधील टुमकूर येथील भाजप आमदारानी आपल्या वाढिदवसानिमित्त चक्क जंगी पार्टीचे आयोजन केल्याची धक्कादायक मिळत आहे. या पार्टीत आमदाराने बिर्याणीचा बेत पाहुण्यांसाठी ठेवला होता. तर दुसरीकडे झारखंडमध्येही जामताडात काँग्रेस आमदार लोकांमध्ये जाऊन पैसे वाटप करतानाची माहितीही समोर येत आहे.

- Advertisement -

काय आहे घटना

कर्नाटकमधील भाजप आमदार एम. जयराम यांनी लॉकडाऊनचे भान न राखता आपल्या वाढदिवसाला शाही, जंगी पार्टी दिली. ही पार्टी कर्नाटकच्या टुमकुरमधील सरकारी शाळेत आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला गुब्बी तालुक्यातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता. त्यामुळे गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेले येथे पाहायला मिळाले. सध्या कर्नाटकमध्ये १९० जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू यामुळे झाला आहे. तरीही असे जाहीर कार्यक्रम होत असल्याने लोकांमध्ये संपाताची लाट आहे. तर झारखंडमध्ये काँग्रेस आमदार इरफान अंसारी यांनी महिलांमध्ये १०-१० रुपयांचे वाटप करतानाचा व्हिडिओ जारी झाला आहे. इथेही सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याचे दिसून आहे.

हेही वाचा –

लॉकडाऊनमुळे निर्यात क्षेत्रावर संकट; दीड कोटी नोकऱ्यांवर कुऱ्हाड येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -