घरदेश-विदेशमायवतींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदाराचा माफीनामा

मायवतींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदाराचा माफीनामा

Subscribe

माझा हेतू कुणालाही दुखवण्याचा नव्हता. मात्र, माझ्या भाषणातून कुणाला ठेच पोहोचली असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते, अशा शब्दांत साधना सिंह यांनी माफी मागितली आहे.

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदार साधन सिंह यांनी आपला माफीनामा सादर केला आहे. त्यांनी मायावतींविरोधात अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यांनी आपल्या माफीनाम्यात असे म्हटले आहे की, माझा हेतू कुणालाही दुखवण्याचा नव्हता. मात्र, माझ्या भाषणातून कुणाला ठेच पोहोचली असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते, अशा शब्दांत साधना सिंह यांनी माफी मागितली आहे. दरम्यान, दुसरीकडे भाजपने देखील साधना सिंह यांनी केलेले वक्तव्य निंदात्मक असल्याचे म्हटले आहे. भाजपने साधना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. दरम्यान, साधना सिंह यांच्याविरोधात चंदौलीची बबुरी पोलीस ठाण्यात बसपाचे नेते रामचंद्र गौतम यांनी तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या साधना सिंह

भाजपा आमदार साधना सिंह यांची शनिवारी चंदौलीमध्ये सभा झाली. या सभे दरम्यान त्यांनी असे म्हटले आहे की, ‘आम्हाला माजी मुख्यमंत्री मायावती न महिला वाटतात आणि न पुरुष. त्या तृतीयपंथीयांपेक्षाही खालच्या दर्जाच्या आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते. त्यावेळी त्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली. द्रौपदी एक स्वाभिमानी महिला होती. आणि ही आजची महिला. जिचे सर्वकाही लुटले गेले तरी देखील खुर्ची मिळवण्यासाठी तिने स्वत:चा सन्मान विकून टाकला आहे. अशी महिला मायावतीजीचा आम्ही तिरस्कार करतो. जी महिलांसाठी कलंक आहे’, अशी वादग्रस्त टीका साधना सिंह यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -