घरदेश-विदेशतर बर्मुडाच घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

तर बर्मुडाच घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

Subscribe

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली आहे. जसजशी तारीख जवळ येत आहे तसं राजकीय नेते देखील स्फोटक विधानं करत आहेत. एकमेकांवर आरोप करत असताना मर्यादा देखील ओलांडत आहेत. पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. ममता बॅनर्जी यांना प्लास्टर केलेला पाय दाखवायचा असेल तर बरमुडा घाला, असं धक्कादायक विधान दिलीप घोष यांनी केलं आहे. बंगालमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर प्रचार सभांचा धुरळा उडत आहे.

ममता बॅनर्जी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मात्र, तरी देखील त्या प्रचारात उतरल्या आहेत. यावरुन ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधायला गेलेल्या दिलीप घोष यांची जीभ घसरली आणि वादग्रस्त विधान त्यांनी केलं. “यापूर्वी कोणीही साडी नेसलेली मी पाहिली नाही. जर आपल्याला आपले पाय दाखवायचे असतील तर साडी का घालता… बर्मुडा घाला. जेणेकरून प्रत्येकाला ते दिसेल,” असं वादग्रस्त विधान घोष यांनी केलं.

- Advertisement -

दिलीप घोष यांच्या विधानानंतर तृणमुल काँग्रेसच्या महिला नेत्यांनी तिव्र निषेध केला आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ममताजींना बर्मुडा घालून या असं दिलीप घोष यांनी म्हटलं. छोटी आणि भ्रष्ट मानसिकतेचे माकडांना वाटतंय की ते बंगाल जिंकणार आहेत?,” असा जोरदार टोला महुआ मोइत्रा यांनी लगावला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -