घरमहाराष्ट्रलोहगड-अकोला मार्गाची विद्युतीकरण चाचणी यशस्वी

लोहगड-अकोला मार्गाची विद्युतीकरण चाचणी यशस्वी

Subscribe

चाचणी करताना रेल्वे ताशी १०० किमी वेगाने धावली.

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक योजना राबवत असते. त्यातच दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अनेक लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम झपाट्याने सुरु आहे. त्यातच आता लोहगड ते अकोला लोहमार्गाचे विद्युतीकरण चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला ते पुर्णा ब्रॉडगेज लोहमार्गाचे विद्युतीकरणाचे काम पुर्णत्वास आले आहे. लोहगड ते अकोला या लोहमार्गाची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून २४ मार्चला करण्यात आली. दरम्यान, चाचणी करताना रेल्वे ताशी १०० किमी वेगाने धावली. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाल्याचे मानण्यात आले.याशिवाय अनेक लोहमार्गाचे विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. अकोला ते पुर्णापर्यंतच्या लोहमार्गाचे काम वेगात सुरु आहे. यात आता अकोला ते अमनवाडीपर्यंत लोहमार्गाचे विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले आहे.

अकोला ते लोहगडपर्यंतच्या विद्युतीकरणाची दक्षिण-मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्त ए.के. रॉय यांनी बुधवारी २४ मार्चला यशस्वी चाचणी घेतली . बुधवारी लोहगड येथून चाचणीला सुरुवात झाली असून सकाळी ११.४५ मिनिटांनी लोहगड येथून रवाना झालेली रेल्वे दुपारी १२.४५ वाजता अकोल्यात दाखल झाली. या चाचणीदरम्यान नांदेड विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि स्ठानिक कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती.नांदेड येथून केलेली विशेष निरीक्षण रेल्वे चाचणीदरम्यान ही रेल्वे ताशी १०० किमी इतक्या वेगाने धावली. अखेर लोहगड ते अकोला या लोहमार्गामुळे विद्युतीकरणाची चाचणी यशस्वी ठरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फोन टॅपिंग प्रकरण: मुख्य सचिवांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -