घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये कमळ फुललं, पण भाजप पराभूत?

उत्तराखंडमध्ये कमळ फुललं, पण भाजप पराभूत?

Subscribe

रविवारी झालेल्या या निवडणुकांचे निकाल लागले असून भाजपनं बाजी मारली आहे. उत्तराखंडमधील ८४ शहरांपैकी ८३ शहरांमधील निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत.

अखेर उत्तराखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे लागले आहेत. रविवारी झालेल्या या निवडणुकांचे निकाल लागले असून भाजपनं बाजी मारली आहे. उत्तराखंडमधील ८४ शहरांपैकी ८३ शहरांमधील निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपनं बाजी मारली आहे. ८४ पैकी ३४ जागी भाजप, २६ जागांवर काँग्रेस आणि २३ जागांवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. तर मायावतींच्या बसपाला केवळ १ जागा जिंकता आली आहे. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये ७ पैकी २ जागी भाजपनं विजय मिळवला आहे. तर ३ जागांवर काँग्रेस आणि २ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.  भाजपासाठी निवडणुकांचा हा निकाल आनंद देणारा असला आहे. मात्र, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्रिवेंद्रसिंह रावत हे डोईवाला मतदारसंघातून आमदार आहेत. त्यानंतर देखील भाजपला येथे पराभूत स्वीकारावा लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये १०६४ जागांपैकी १०२२ ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपनं ३०३, काँग्रेसनं १६५, आपनं २ आणि बसपानं ४ जागी विजय मिळवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल ५४६ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -