घरदेश-विदेशचीनमध्ये केमिकल कंपनीजवळ स्फोट; २२ जणांचा मृत्यू

चीनमध्ये केमिकल कंपनीजवळ स्फोट; २२ जणांचा मृत्यू

Subscribe

चीनची राजधानी बिजिंगमध्ये मध्यरात्री केमिकल प्लांटजवळ स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर ताबडतोब बचावकार्य करण्यात येत आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या स्फोटाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरु आहे.

चीनमध्ये केमिकल कंपनीजवळ मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. चीनची राजधानी बिजिंगमध्ये मध्यरात्री १२.४१ वाजता ही घटना घडली आहे. या स्फोटामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे तर २२ जणांपेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना नजीकच्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामध्ये अनेकांजा मृत्यू आग लागल्यामुळे झाला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

झांगजीकौमधील हेबेईच्या शेंघुआ केमिकल कंपनीजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये ५० मोठो आणि छोटे ट्रक जळून खाक झाले आहेत. या स्फोटामध्ये रस्त्याच्या शेजारी पार्क केलेल्या गाड्या देखील जळून खाक झाल्या आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मोठे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

स्फोटाचा तपास सुरु

केमिकल कंपनीजवळ झालेल्या या स्फोटामध्ये २२ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. घटनास्थळावर ताबडतोब बचावकार्य करण्यात येत आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या स्फोटाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -