घरमुंबईकांदिवलीत डान्स करताना १२ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू

कांदिवलीत डान्स करताना १२ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू

Subscribe

कांदिवलीत सीएम चषक स्पर्धेत डान्स करत असताना मुलीचा मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

कांदिवलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सीएम चषक कार्यक्रमात डान्स करत असताना एका मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कांदिवलीच्या लालडी पाडा येथे ही घटना घडली आहे. १२ वर्षाच्या अभिलाषा शर्माचा स्टेजवर डान्स करत असताना मृत्यू झाला. अभिलाषाचा डान्स कार्यक्रमाला आलेले सर्व जण मोबाईलमध्ये कैद करत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीएम चषक कार्यक्रमात अभिलाषा डान्स करण्यासाठी सहभागी झाली होती. अभिलाषाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

डान्स करताना मृत्यू

कांदिवली पश्चिम येथील लालडी पाडा येथे गेल्या काही दिवसापासून सीएम चषकचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमामध्ये काल डान्सच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अभिलाषाने सहभाग घेतला होता. त्यानुसार अभिलाशा स्टेजवर डान्स करत होती. अचानक ती स्टेजवरच कोसळली. नेमकं काय झालं हे कोणालाच कळाले नाही.

पोलिसात तक्रार दाखल

अभिलाषाला घेऊन सर्व जण तातडीने जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गेले. रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अभिलाषाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. अभिलाषाच्या कुटुंबियांनी याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisement -

कार्यक्रम आयोजनकावर आरोप

दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन करणारे आयोजक कमलेश यादव यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांना वेळेत खाण्यासाठी न दिल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास झाला पाहिजे असे मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -