घरदेश-विदेशAditya L-1 : भारताचा सूर्यनमस्कार; आदित्य एल-1 पोहचले निर्धारित पॉइंटवर

Aditya L-1 : भारताचा सूर्यनमस्कार; आदित्य एल-1 पोहचले निर्धारित पॉइंटवर

Subscribe

नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रात भारताने आणखी एक झेप घेतली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रो एकामागून एक मोहिमा राबवत आहे. इस्रोने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ब्लॅक हॉलचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करून संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. आता इस्रोची सौर मोहीम Aditya L-1 पॉंइंटवर पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. (Breaking Surya Namaskar of India Aditya L1 reached the designated point)

नरेंद्र मोदींनी ट्वीट करताना म्हटले की, भारताने आणखी एक पराक्रम केला आहे. भारतातील पहिली सौर मोहीम आदित्य-L1 निर्धारित पॉइंटवर पोहोचली आहे. आमच्या शास्त्रज्ञांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाचे कौतुक करण्यात मी राष्ट्रासोबत सामील होतो. आम्ही मानवतेच्या हितासाठी विज्ञानाच्या नवीन सीमांचा पाठपुरावा करत राहू, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

लैग्रेंज पाइंट एल 1 येथे सुरक्षितपणे पोहोचलो

इस्रो आदित्य एल-1 ने ट्वीट करताना म्हटले की, मी माझ्या घरापासून 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या लैग्रेंज पाइंट एल-1 येथे सुरक्षितपणे पोहोचलो आहे. पृथ्वी पासून दूर असल्यामुळे मी उत्सुक आहे, पण सौर रहस्ये उलगडण्यासाठी पृथ्वीपासून जवळून जोडलेलो आहे. 15 लाख किमी दूर असूनही शेजारीच असल्यासारखे वाटत आहे.  वाटतं. Lagrange Point L-1 वरून एक्सप्लोर करण्यासाठी सज्ज!

- Advertisement -

सूर्याचा दोन वर्ष करणार सखोल अभ्यास

L-1 पॉईंटवर आदित्य एल-1 हे अंतराळयान दोन वर्षे सूर्याचा सखोल अभ्यास करणार आहे. आदित्य एल-1 अंतराळयानाचे सात पेलोड्स सौर घटनेचा अभ्यास करतील. ज्यामुळे भविष्यात अनेक रहस्य उलगडण्यास मदत होईल. इस्रोने 2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे अंतराळयान अवकाशात सोडले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून आदित्य L-1चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर हे अंतरळयान विविध टप्पे पार करत पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्रातून बाहेर पडून सूर्य-पृथ्वी ‘लॅग्रेज पॉइंट’कडे सरकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -