घरमहाराष्ट्रपुणेइतिहासाचा विपर्यास करणं टाळलं पाहिजे, असे म्हणत Sharad Pawar यांची 'या' नाटकावर...

इतिहासाचा विपर्यास करणं टाळलं पाहिजे, असे म्हणत Sharad Pawar यांची ‘या’ नाटकावर अप्रत्यक्ष टीका

Subscribe

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (6 जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawad) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, सत्याची आस असलेले नाटक प्रेक्षक स्वीकारतील, मात्र त्यासाठी इतिहासाचा विपर्यास करणारी नाटके टाळली पाहिजेत, असे सूचक वक्तव्य करतानाच त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर अप्रत्यक्ष टीका केली. (Sharad Pawar indirect criticism of the drama Raigadala Jevha Jaag Yete says that distortion of history should be avoided)

हेही वाचा – Sharad Mohol Murder : तिघांनी झाडल्या गोळ्या, आरोपींसोबत दोन्ही वकील एकाच गाडीमध्ये – Pune Police

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, अनेक कारणांनी नाट्यसंमेलन साजरा होण्यास उशीर झाला आहे. परंतु हे संमेलन निर्विग्न पार पडत आहे, याचा आनंद आहे. काळानुरूप नाटक बदलत गेलं आहे. कौटूंबिक नाटकासह आता ऐतिहासिक नाटकही होत आहेत. नवनवीन विषय नाटकात येत आहेत. राज्यभर नाट्य संमेलन हा सोहळा रंगणार आहे. त्यानिमित्ताने एवढंच सांगायचं आहे की, वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना लागू करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा आणि यासाठी विशेष अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

- Advertisement -

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकावर अप्रत्यक्ष टीका

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर अप्रत्यक्ष टीका करताना शरद पवार म्हणाले की, वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा’ हे नाटक महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करते, परंतु आज महाराज अधिक हतबल झालेले दाखवले जात असल्याचे भासते. ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकात ‘जाग’ या शब्दाचा ‘उभारी’ असा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र त्यामध्ये महाराजांचे शल्य अधिक दाखवले आहे. मी हे नाटक दिल्लीत पाहिले असून सध्याचे प्रेक्षक असा प्रश्न विचारतील की, महाराजांना कुटुंब कलहातील का दाखवले आणि पुरावे मागतील, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – Railway Mega Block : पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; 13 गाड्या रद्द

इतिहासाचा विपर्यास करणारी नाटके टाळावीत

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, कलाकार आणि निर्मात्यांना हिंदीचे जग खुले होत आहे. हिंदीत काम करणे, त्याठिकाणी जाण्यात काहीच गैर नाही. पण रंगभूमी हे माझे ध्येय आहे, असे केवळ सांगण्यापुरते मर्यादीत राहत कामा नये. सत्याची आस असलेले नाटक प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील. पण त्यासाठी सोयीचा इतिहास, इतिहासाचा विपर्यास करणारी नाटकं टाळावीत आणि वास्तव असेलला इतिहास नाट्यमय पद्धतीने मांडला जावा, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -