घरदेश-विदेश'केवळ राम नको, राम - सीता दोघांचा पुतळा उभारा'

‘केवळ राम नको, राम – सीता दोघांचा पुतळा उभारा’

Subscribe

शरयू नदी किनारी केवळ रामाचा भव्य पुतळा उभा करू नका. तर, रामाच्या पुतळ्याची उंची कमी करून  राम आणि सीता या दोघांचा देखील पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेत्यानं पत्राद्वारे केली आहे.

शरयू नदी किनाऱ्यावर रामाची भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यावर आता काँग्रसचे नेते कर्ण सिंग यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून एक पर्याय सुचवला आहे. त्यामध्ये कर्ण सिंह म्हणतात की, केवळ रामाचा भव्य पुतळा उभा करू नका. तर, रामाच्या पुतळ्याची उंची कमी करून  राम आणि सीता या दोघांचा देखील पुतळा उभारण्यात यावा. सीता लग्न करून अयोध्येमध्ये तर आली. पण, काही दिवसांमध्ये त्यांना वनवासात जावे लागले. त्यावेळी रावणानं त्यांना पळवून लंकेमध्ये नेलं. त्यानंतर जेव्हा सीता अयोध्येमध्ये आली तेव्हा अग्निपरिेक्षेला सामोरं जावं लागलं. त्यामुळे राम – सीता असा दोघांचा देखील पुतळा उभारण्यात यावा. किमान हजारो वर्षानंतर का असेना सीतेला अयोध्येमध्ये आपला मान – सन्मान तरी परत मिळेल. असं कर्ण सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरातमधील नर्मदा नदीच्या किनारी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांन देखील भव्य राम पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यावर आता काँग्रेस नेते कर्ण सिंह यांनी केवळ राम नको, तर राम आणि सीता असा दोघांचा पुतळा उभारा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

वाचा – ‘रामाचा पुतळा हा अयोध्येची ओळख असेल’

राम मंदिराचा प्रश्न 

अयोध्येतील राम मंदिरााच्या प्रश्नावरून सध्या देशात राजकारण सुरू आहे. भाजपनं २०१४ साली केलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण करून देत राम मंदिर केव्हा बांधणार असा सवाल केला जात आहे. राष्ट्रीय, स्वयंसेवक संघ, शिवसेना आणि विहिंप देखील या प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायाला मिळत आहे. दरम्यान राम मंदिराचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे.

वाचा – स्टॅच्यु ऑफ युनिटीपेक्षाही उंच रामाचा पुतळा; पाहा कसा दिसेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -