घरमनोरंजन‘रात्रीस खेळ चाले’ पुन्हा येणार!

‘रात्रीस खेळ चाले’ पुन्हा येणार!

Subscribe

'रात्रीस खेळ चाले'च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मालवणी भाषा, कोकण, कोकणातील संस्कृती, तिथली माणसं प्रेक्षकांसमोर आली ती ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकांमुळे. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ‘पांडू इलो’, इसरलय ही वाक्य प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ झाली ती गाव गाता गजाली या मालिकेमुळे. या मालिकेने प्रेक्षकांचा तात्पुरता निरोप घेतला होता. मात्र ‘रात्रीस खेळ चाले’च्या प्रेक्षकांसाठी आता खूशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिका संपतानाच ‘लवकरच आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येऊ’, असे अश्वासन दिलं होतं. अखेर मालिकेच्या संपूर्ण टीमने हे अश्वासन पूर्ण केलं आहे.

गुढ आणि आणि रहस्यमय मालिका

झी मराठी वाहिनीवरील दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला गुढ घेऊन येत आहे. नाईकांचा वाडा ते अगदी पांडूचे इसरलय ही सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. नुकतेच झी मराठी वाहिनीवर रहस्यमय म्युझिकवर एक गुढ टिझर प्रसारित केला आहे. पांडू इलो… म्हणत झी मराठीने रात्रीस खेळ चालेचा प्रोमो रिलीज केल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही मालिका पाहता येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या या टीझरवर आलेल्या प्रतिक्रियामंध्ये चाहत्यांनी ‘रात्रीस खेळ चाले’चं नाव घेतलं आहे. त्यामुळे मालिकेचं कथानक काय असेल? पात्र कोणती असणार आहेत? नाईकांच्या वाडयातील रहस्यमय घटनांमागचं गुढ उलगडणार का? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे.

- Advertisement -

पांडूने केले मालिकेचं लेखन

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं लेखन अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांने केले आहे. तसेच या मालिकेतील सुशल्या म्हणजे ऋतुजा धर्माधिकारी हिला देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव, पांडू अशा पुन्हा एकदा प्रेक्षकांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

(सौजन्य : झी मराठी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -