घरदेश-विदेशएअर इंडिया सहा महिन्यात बंद होणार?

एअर इंडिया सहा महिन्यात बंद होणार?

Subscribe

आर्थिक संकटात अडकलेली एअर इंडिया ही कंपनी लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तोट्यात जाणाऱ्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेतला पण अद्याप एकही खरेदीदार मिळालेला नाही. जूनपर्यंत एकही खरेदीदार न आल्यास एअर इंडियाचे कामकाज बंद करावे लागणार आहे. सध्या एअर इंडियावर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही सरकारने या कंपनीच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे.

एअर इंडिया कंपनीची सध्या १२ विमानं धुळखात पडून आहेत. ती पुन्हा सुरू करण्यासाठी गुंतवणूकीची गरज आहे. मात्र सरकारने गुंतवणूकीबाबत हात वर केले आहेत. आता तुकड्या-तुकड्यांवर गुंतवणूकीतून एअर इंडियाची गाडी चालवता येणार नाही अस म्हणत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कंपनी बंद होण्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

एअर इंडिया कामकाच सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारकडे २४०० कोटी रूपयांची हमी मागण्यात आली होती. परंतू सरकारने केवळ ५०० कोटींची हमी दिली. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सरकारने २०११-१२ या आर्थिक वर्षापासून यंदाच्या डिसेंबरपर्यंत एअर इंडिया कंपनीत ३०,५२०.२१ कोटी रूपये गुंतवले. तर कंपनीला २०१८-१९ या वर्षात अंदाजे ८,५५६.३५ कोटींचा तोटा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -