घरदेश-विदेशमांजराऐवढे गोंडस वासरु

मांजराऐवढे गोंडस वासरु

Subscribe

मांजराऐवढे छोटे आणि गोंडस वासरु अनेकांचे आकर्षण ठरले आहे. या वासराचे वजन इतर वासरांपेक्षा १० पटीने कमी असून सोशल मिडियावर हे वासरु चर्चेचा विषय ठरले आहे.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील एक धष्टपृष्ट गाय आपल्या वजनामुळे चर्चेत आली होती आणि आता एक असे वासरु चर्चेत आले आहे. ज्या वासराचे वजन कमी असून हे वासरु मांजरी ऐवढ्या उंचीचे आहे. हे वासरु अमेरिकेच्या मिसीसिपी राज्यात जन्मला आले आहे. सामान्यत: जन्माला येणारे वासरु बकरी इतक्या आकाराचे असते. मात्र, अमेरिकेमध्ये मांजराऐवढ्या आकाराचे वासरु जन्माला आले आहे. या वासराचे वजन फक्त साडेचार किलोग्रॅमच्या जवळपास आहे. गोंडस अशा वासराची प्रकृती चांगली असून सोशल माध्यमांवर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. तसेच या वासराला लिलबिल असे नाव देण्यात आले असून या लिलबिलच्या नावाचे वेगळे पेजही तयार करण्यात आले आहे.

हे वासरु ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

सोशल मीडियावर हे वासरु आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. मिररच्या वृत्तानुसार या वासराचे वजन आणि आकार पाहून हैराण झालेल्या मालकाने मिसीसीपी स्टेट विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतल्यानंतर या वासराची माहिती समोर आली आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी वासराची तपासणी केली असता वासराची प्रकृत्ती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या वासराचे वजन इतर वजनापेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी या वासराची माहिती छायाचित्रांसह सोशल माध्यमांवर पोस्ट केल्यानंतर लोकांनी त्या वासला पाहून आनंद व्यक्त केला आहे. तसेच या गोंडस वासरावर प्रेमाचा वर्षाव सुरु केला आहे.

- Advertisement -

इतर वासरांपेक्षा १० पटीने वजन कमी

लिलबिल या वासराचे वजन सामान्य वासरांपेक्षा १० पट्टीने कमी असल्याची माहिती डॉक्टरांनी फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. गायीचे हे छायाचित्र पाहून अनेकांच्या मनाला भावले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच बऱ्याच लोकांनी त्या वासराकरता प्रार्थना देखील केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -