घरदेश-विदेशशिखविरोधी दंगलीत माझा हात नाही - कमलनाथ

शिखविरोधी दंगलीत माझा हात नाही – कमलनाथ

Subscribe

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ते १९८४ ला झालेल्या शिखविरोधी दंगलीत त्यांचा हात असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र स्वतः कमलनाथ यांनी यावर खुलासा दिलेला आहे. इंडिया टुडे वृत्त समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कमलनाथ म्हणाले की, “त्या दंगलीशी माझा काहीच संबंध नाही. आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही.” असा खुलासा कमलनाथ यांनी केला आहे. कमलनाथ हे काँग्रेसच्या जुन्या फळीतील अनुभवी नेते आहेत. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी ९ वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. शिख विरोधी दंगलीची चौकशी करणाऱ्या नानावटी समितीने कमलनाथ यांच्यावर दंगलीचा ठपका ठेवला होता.

मात्र त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्याने त्यांच्यावरील आरोप नंतर वगळण्यात आले होते.
मात्र आता मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर शिख विरोधी दंगलीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. “कमलनाथ यांचे नाव जर मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर झाले तर आम्ही शिखांना घेऊन देशव्यापी आंदोलन करु”, असा इशाराच अकाली दलाचे नेते मजिंदर सिंह सिरसा यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.

- Advertisement -

शिख विरोधी दंगलीची पार्श्वभूमी

१९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात घुसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार राबवले होते. त्यामुळेच इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक चांगलेच खवळले होते आणि त्यांनीच इंदिरा गांधी यांची हत्या केली. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात जवळपास ३ हजार शिखांची कत्तल झाली असल्याचे बोलले जाते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर दंगल भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -