घरदेश-विदेशभारत बंद ! केंद्र सरकारने राज्यांसाठी जाहीर केली नवीन मार्गदर्शके

भारत बंद ! केंद्र सरकारने राज्यांसाठी जाहीर केली नवीन मार्गदर्शके

Subscribe

केंद्र सरकारने ८ डिसेंबर भारतबंदच्या निमित्ताने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये मुख्यत्वेकरून कोरोनाशी संबंधित मार्गदर्शके पालन करण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना, विविध संघटना तसेच राजकीय संघटनांकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशाला मार्गदर्शके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुख्यत्वेकरून सुरक्षा व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था अधिक चोख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रामुख्याने कोरोनासाठी जारी केलेल्या गाईडलाईन्स तसेच सोशल डिस्टन्सिंगदेखील फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. भारत बंदचे आवाहन केले असले तरीही शांतता राखणे हे मुख्य उदिष्ट ठेवण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. गेल्या ११ दिवसांपासून देशातील अनेक शेतकरी हे नव्या कृषी विधेयकांना विरोध करत आहेत. शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत भारत बंदचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

शेतकरी संघटनांनी जाहीर केल्याप्रमाणे हे केवळ प्रतिकात्मक आंदोलन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या काही धोरणांना पाठिंबा देत नाही यासाठीचे आंदोलन असेल असे संघटनांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची पुढची फेरी ही येत्या बुधवारी म्हणजे ९ डिसेंबरला असणार आहे. शेतकरी संघटनांकडून उद्या ८ डिसेंबरला सकाळी ११ ते ३ या कालावधीत भारतबंदचे आवाहन करण्यात आले आहे. शांततामय मार्गाने हा भारत बंद पाळण्यात येईल असेही शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -