घरदेश-विदेशVideo: करोडोंची गाडी क्षणांतच भंगारात

Video: करोडोंची गाडी क्षणांतच भंगारात

Subscribe

आपण एखादी नवी वस्तू खरेदी करतो तेव्हा खूप जास्त आनंदी असतो. त्यातही ती गोष्ट महागडी असेल तर आपला आनंद गगनात मावत नाही.

एखादी नवीन गोष्ट विकत घेण्याचा आणि त्याहून जास्त ती इतरांना दाखवण्याचा आनंदच काही निराळा असतो. त्यातही ती गोष्ट खूप महागडी तर विकत घेणाऱ्याचा आनंदाला पारावार उरत नाही. मात्र, अशी एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर काही तासांतच ती पार उद्ध्वस्त होऊन गेली तर? तुमच्या आनंदावर विरझण पडल्याशिवाय राहणार नाही. नुकतीच अशाचप्रकारची एक घटना चीनच्या एका महिलेसोबत घडली आहे.

असा घडला नेमका प्रकार...

चीननधील या महिलेने एक नवी-कोरी गाडी खरेदी केली होती. ही गाडी होती ४.५ कोटी रूपयांची लाल फेरारी. इतकी महागडी आणि ब्रँडेड गाडी विकत घेतल्यामुळे त्या महिलेचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र, अवघ्या काही तासांत तिचा आनंद पूर्णपणे दु:खामध्ये बदलला. गाडी खरेदी केल्यानंतर ती स्वत: ड्राईव्ह करत ही महिला निघाली. मात्र थोड्या अंतरावर जाताच तिचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकाचा कठडा तोडून पलीकडे जाऊन पोहोचली. दुभाजकाच्या पलिकडे गेल्यानंतर ही गाडी अन्य काही गांड्यांना धडकली. या जोरदार धडकेमध्ये फेरारी गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

- Advertisement -

अपघातग्रस्त गाडी भाड्याची?

या अपघातामध्ये सुदैवाने त्या महिलेला किंवा आणखी कुणाला कोणतीच दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे त्या महिलेची झोप उडाली असणार हे नक्की. फेररीच्या अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर काही लोकांनी ‘अपघातग्रस्त गाडी ही त्या महिलेच्या मालकीची नसून, भाड्याची आहे’, अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -